सिंधुदुर्ग : दोन लाखांचा ऐवज लंपास : कुडाळ, बांदा पाठोपाठ दोडामार्गचा नंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 06:04 PM2018-07-26T18:04:54+5:302018-07-26T18:08:32+5:30

दोडामार्ग येथील बाजारपेठेतील सोनू-सुधा कॉम्प्लेक्समधील दीप फोटो स्टुडिओ कटावणीच्या सहाय्याने फोडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी निकॉन कंपनीच्या दोन कॅमेऱ्यांसह दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

Sindhudurg: Lakhs of two lakhs: Kudal, Banda followed by Doda road number | सिंधुदुर्ग : दोन लाखांचा ऐवज लंपास : कुडाळ, बांदा पाठोपाठ दोडामार्गचा नंबर

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.

googlenewsNext
ठळक मुद्देदोन लाखांचा ऐवज लंपास : कुडाळ, बांदा पाठोपाठ दोडामार्गचा नंबरफोटो स्टुडिओ फोडण्याचे सत्र सुरूच

दोडामार्ग : येथील बाजारपेठेतील सोनू-सुधा कॉम्प्लेक्समधील दीप फोटो स्टुडिओ कटावणीच्या सहाय्याने फोडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी निकॉन कंपनीच्या दोन कॅमेऱ्यांसह दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दीड महिन्यापूर्वी मालवण, बांदा व कुडाळ येथे फोटो स्टुडिओ फोडण्यासाठी चोरट्यांनी जी पध्दत अवलंबिली होती, तीच पध्दत या चोरीतही वापरण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

येथील बाजारपेठेतील सोनू-सुधा कॉम्प्लेक्समध्ये संदीप देसाई यांचा दीप फोटो स्टुडिओ आहे. गेल्या चार वर्षांपासून हा फोटो स्टुडिओ येछे कार्यरत आहे.

मात्र, तो मंगळवारी मध्यरात्रीनंतर फोडण्यात आला. देसाई यांना फोटो स्टुडिओ फोडण्यात आल्याची माहिती मिळताच ते तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. चोरट्यांनी कटावणीच्या सहाय्याने शटरचे गज वाकवून आतमधील काचेचा दरवाजा फोडला.

या चोरीत निकॉन कंपनीचे ३२ हजार व ६८ हजार रूपयांचे दोन कॅमेरे, २८ हजार रूपयांचा लेनेवो लॅपटॉप, ४५ हजार रूपयांचा कॉम्प्युटर, डेल कंपनीचा १२ हजार रूपयांचा डेक्सटॉप, १८०० रूपयांची ३२ जीबीची दोन मेमरी कार्ड, १६ जीबीची १२०० रूपयांची तीन मेमरी कार्ड, १२ हजार रूपयांचा कॅनॉन प्रिंटर असा दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला.
याबाबत देसाई यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी घटनास्थळाची पाहणी केली व पंचनामा केला.

कुडाळ, बांदा पाठोपाठ दोडामार्ग लक्ष्य

दीड महिन्यांपूर्वी कुडाळ व बांदा येथे चोरट्यांनी फोटो स्टुडिओ फोडून किंमती कॅमेरे व इतर साहित्याची चोरी केली होती. त्यानंतर काही काळ चोरटे शांत होते. मात्र, पुन्हा एकदा चोरट्यांनी दीप फोटो स्टुडिओ फोडण्यासाठी वापरलेली पद्धत एकच असल्याने खळबळ उडाली आहे.

श्वानपथकाला पाचारण

पोलिसांनी सिंधुदुर्ग येथून श्वानपथकाला पाचारण केले. सायंकाळी उशिरा श्वानपथक दोडामार्गमध्ये दाखल झाले. मात्र ते कॉम्प्लेक्सच्या परिसरातच घुटमळत राहिल्याने चोरट्यांचा छडा सायंकाळपर्यंत लागू शकला नाही.

 

Web Title: Sindhudurg: Lakhs of two lakhs: Kudal, Banda followed by Doda road number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.