सिंधुुदुर्ग : मधुमेहदिनानिमित्त वैभववाडी, दोडामार्ग रुग्णालयात उपक्रमाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 11:42 AM2018-11-15T11:42:40+5:302018-11-15T11:45:29+5:30
सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील १८ वर्षावरील व्यक्तींंनी आपण आपल्या उच्च रक्तदाब, शुगर,चाचणी तपासणी करून घ्यावी. तसेच २७ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या ३२०९ लसीकरण सत्रात दिड लाख विद्यार्थ्यांना मोफत गोवर, रुबेला लसीकरण केले जाणार आहे .या कार्यक्रमाला जिल्हा वासीयांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकोरकर यांनी केले.
सिंधुुदुर्ग : जिल्ह्यात उच्च रक्तदाबामुळे होणाऱ्या आजाराचे प्रमाण लक्षात घेता, प्रायोगिक तत्त्वावर जिल्हा रुग्णालय वैभववाडी, दोडामार्ग रुग्णालयात तपासणी उपचार सुरू केले आहेत. जिल्ह्यातील १८ वर्षावरील व्यक्तींंनी आपण आपल्या उच्च रक्तदाब, शुगर,चाचणी तपासणी करून घ्यावी. तसेच २७ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या ३२०९ लसीकरण सत्रात दिड लाख विद्यार्थ्यांना मोफत गोवर, रुबेला लसीकरण केले जाणार आहे .या कार्यक्रमाला जिल्हा वासीयांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकोरकर यांनी केले.
डॉ. चाकोरकर म्हणाले उच्च रक्तदाबामुळे होणारे ह्दयविकारा सारखे आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी इंडियन हायपर टेंशन मँनेजमेंट इन्स्टिटयूट मार्फत राज्यात सातारा, सिंधुदुर्ग, वर्धा, आणि भंडारा जिल्ह्यामध्ये या उपक्रम करण्याचे निश्चित केले आहे. याच अनुशंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी, दोडामार्ग, तालुक्यात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येत आहे.
जागतिक मधुमेह दिन, व बालदिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचा शुभारंभ झाला आहे. तसेच उच्च रक्तदाबाची जाणीव २५ टक्के लोकांना असते व केवळ १० टक्के लोकांंचा रक्तदाब नियंत्रीत असतो. महाराष्ट्रात दर चार व्यक्तीपैकी एकास उच्च रक्तदाब आहे असा निकष व अंदाज आहे.
दरम्यान या कार्यक्रमात उच्च रक्तदाबाचे निदान झालेल्या रुग्णांना नियमित उपचार देण्याचे निश्चित करुन औषधोपचार नियमितपणे पुरविले जाणार आहे .तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी लिहून दिलेली औषधे रुग्णांनंजवळ आरोग्य कर्मचाऱ्यांना वितरीत करणार आहे व उच्च रक्तदाबाचे रुग्ण संख्या नियंत्रित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय आणि वैभववाडी ,दोडामार्ग , ग्रामीण रुग्णालय येथे या कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे टप्याटप्याने अन्य तालूक्यात ही या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. असे डॉ. चाकोरकर यांनी सांगितले.
बालवयातही मधुमेह संख्या अधिक
बालकांमधील मधुमेह संख्या अनुवंशिक प्रकाराने वाढते आहे. तर प्रमाण कमी करण्यासाठी तपासणी केली जात आहे. पालकांनी या मधुमेह तपासणी उपचार योग्य ठरणार आहे यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना बालवयातच मैदानी खेळ व व्यायामावर भर देणे गरजेचे आहे असेही यावेळी सांगण्यात आले.