सिंधुदुर्ग : ड्रीमलँडमुळे पर्यटनाला चालना : वैभव नाईक, पिंगुळी-गोंधयाळेतील वॉटरपार्कचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 05:11 PM2018-01-25T17:11:46+5:302018-01-25T17:16:50+5:30
पिंगुळी-गोंधयाळे येथे इलियास शेख यांनी उभारलेल्या भव्यदिव्य अशा ड्रीमलँड गार्डन रेस्टॉरंट व वॉटरपार्क प्रकल्पामुळे जिल्ह्यात येणाºया पर्यटकासांठी सर्व सुविधांनी सुसज्ज असे पर्यटनस्थळ उपलब्ध झाले आहे. या प्रकल्पामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी ड्रीमलँड गार्डन रेस्टारंट व वॉटरपार्क प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी केले. हा प्रकल्प सर्व जिल्हावासीयांनी आवर्जून पहावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कुडाळ : पिंगुळी-गोंधयाळे येथे इलियास शेख यांनी उभारलेल्या भव्यदिव्य अशा ड्रीमलँड गार्डन रेस्टॉरंट व वॉटरपार्क प्रकल्पामुळे जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकासांठी सर्व सुविधांनी सुसज्ज असे पर्यटनस्थळ उपलब्ध झाले आहे. या प्रकल्पामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी ड्रीमलँड गार्डन रेस्टारंट व वॉटरपार्क प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी केले. हा प्रकल्प सर्व जिल्हावासीयांनी आवर्जून पहावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पिंगुळी-गोंधयाळे येथील इलियास आदम शेख यांनी त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्याच पिंगुळी-गोंधयाळे येथील जमिनीत आकर्षक असे उद्यान व वॉटर पार्क निर्माण केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव असलेल्या या ड्रीमलँड गार्डन, रेस्टॉरंट आणि वॉटर पार्कचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, ड्रीमलँड गार्डन, रेस्टॉरंट आणि वॉटर पार्कचे संचालक इलियास आदम शेख, सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक शेख, जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, चित्रपट निर्माते साईनाथ जळवी, मालवणी कवी दादा मडकईकर व इतर मान्यवर उपस्थित होते. अतुल बंगे, प्रमोद गावडे यांनी मार्गदर्शन केले. निवेदन नागेश नेमळेकर यांनी केले तर आभार मुश्ताक शेख यांनी मानले.
४ फेब्रुवारीला काजू परिषद
पिंगुळी येथील नूतन गार्डन व वॉटरपार्कच्या ठिकाणी ४ फेब्रुवारी रोजी काजू परिषद घेणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. तसेच या प्रकल्पाकडे येणारा रस्ता खराब झाला असून त्याचा त्रास पर्यटक, नागरिकांना होऊ नये याकरिता येत्या सहा महिन्यात हा रस्ता नव्याने करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.