सिंधुदुर्ग : एस टी च्या सिंधुदुर्ग विभागाचे 28 लाखांचे नुकसान, मराठा समाज आंदोलनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 01:41 PM2018-08-02T13:41:30+5:302018-08-02T13:45:57+5:30
मराठा समाज आरक्षण आंदोलनामुळे एस टी च्या सिंधुदुर्ग विभागाला विविध मार्गावरील गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे 27 लाखांचे तर सहा गाडयांची तोड़फोड़ झाल्याने सुमारे 1 लाखांचे असे एकूण 28 लाखांचे नुकसान झाले आहे.
कणकवली : मराठा समाज आरक्षण आंदोलनामुळे एस टी च्या सिंधुदुर्ग विभागाला विविध मार्गावरील गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे 27 लाखांचे तर सहा गाडयांची तोड़फोड़ झाल्याने सुमारे 1 लाखांचे असे एकूण 28 लाखांचे नुकसान झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बाहेर गेलेल्या तिन गाड़यांची तोड़फोड़ झाली असल्याने एस. टी. च्या सिंधुदुर्ग विभागाचा नुकसानीचा आकड़ा आणखिन वाढणार आहे.
मराठा समाजाकडून 26 जुलै रोजी आरक्षणाच्या मागणीकड़े शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बंद पुकारण्यात आला होता. या दिवशी जिल्ह्यातील काही ठराविक भागातच एस टी ची वाहतुक झाली. त्यामुळे दिवसभरातील 90 टक्के हुन अधिक गाड्यांच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या.
त्यामुळे एस टी च्या सिंधुदुर्ग विभागाला 27 लाखांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सहा गाड़यांची तोड़फोड़ करण्यात आली होती. त्यामुळे एक लाखांहून अधिक नुकसान झाले होते.
सिंधुदुर्गातून सावंतवाड़ी -- अक्कलकोट , कणकवली - लातूर व कुडाळ - विजापुर या बाहेर गेलेल्या तिन गाड्यांवरही दगडफेक झाल्याने या गाडयांचे नुकसान झाले आहे. मात्र, या गाडयांचे नेमके किती नुकसान झाले ? याबाबत नेमकी माहिती उपलब्ध झालेली नाही. ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर नुकसानीचा आकड़ा वाढणार आहे, अशी माहिती एस टी च्या सूत्रांनी दिली.