सिंधुदुर्ग : महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलची निवडणूक लढविणार : नार्वेकर, जिल्ह्यातील असोसिएशनचा आपल्याला पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 05:55 PM2018-01-20T17:55:46+5:302018-01-20T18:00:53+5:30
महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या पंचवार्षिक निवडणुकीत मार्च २०१८ मध्ये होऊ घातली आहे. ही निवडणूक सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन लढविणार असून कोकणसह जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी अॅड. संग्राम देसाई यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले असून तसा ठरावही बैठकीत घेण्यात आला आहे.
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या पंचवार्षिक निवडणुकीत मार्च २०१८ मध्ये होऊ घातली आहे. ही निवडणूक सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन लढविणार असून कोकणसह जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी अॅड. संग्राम देसाई यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले असून तसा ठरावही बैठकीत घेण्यात आला आहे.
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असोसिएशनचा आपल्याला पाठिंबा असल्याची माहिती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र आणि गोवा राज्यात बार कौन्सिलचे एकूण १ लाख २३ हजार एवढे मतदार आहेत. या निवडणुकीतून २५ उमेदवार निवडले जाणार आहेत. ही निवडणूक आतापर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही उमेदवाराने लढविलेली नाही.
सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येथील उमेदवार देण्याचा व निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सर्वानुमते अॅड. संग्राम देसाई यांना उमेदवारी निश्चित करून भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर यांनी दिली.
यावेळी असोसिएशनचे अॅड. राजेंद्र रावराणे, अॅड. वीरेश नाईक, अॅड. संग्राम देसाई, अॅड. अनीश केसरकर, अॅड. अमोल सामंत, अॅड. यतीश खानोलकर, अॅड. वीरेश राऊळ, अॅड. गोविंद बांदेकर, अॅड. सुहास साटम आदि उपस्थित होते.
संग्राम देसाई सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उमेदवार
बार कौन्सिल आॅफ गोवा, महाराष्ट्रची निवडणूक मार्च २0१८ मध्ये होऊ घातली आहे. २५ सदस्य पदांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आतापर्यत सिंधुदुर्गातून कोणीही रिंगणात उतरला नाही. मात्र, यावेळी जिल्ह्यासह कोकणचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी सिंधुदुर्गातून उमेदवार देण्याचा निर्णय बार असोसिएशनने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातून अॅड. संग्राम देसाई यांना पाठिंबा देत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
र्रल्लँि४स्रँङ्म३ङ्म-02