सिंधुदुर्ग : महावितरणला वादळाचा तडाखा, कणकवलीत बरसला पाऊस : पाच वीज उपकेंद्रांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 03:31 PM2018-05-18T15:31:36+5:302018-05-18T15:31:36+5:30

सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढल्यानंतर वादळाने गुरुवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. वैभववाडी व कणकवली तालुक्यात अक्षरश: थैमान घातल्याने या दोन्ही तालुक्यातील वीजपुरवठा ठप्प झाला आहे.

Sindhudurg: Mahavitaran hit storm, rain damaged in Kankavali: Five power sub-stations hit | सिंधुदुर्ग : महावितरणला वादळाचा तडाखा, कणकवलीत बरसला पाऊस : पाच वीज उपकेंद्रांना फटका

वैभववाडी येथील बँक आॅफ इंडियासमोर चष्म्याच्या दुकानावर वडाच्या फांदीसह वीजवाहिन्या कोसळल्या.

googlenewsNext
ठळक मुद्देमहावितरणला वादळाचा तडाखाकणकवलीत बरसला पाऊस : पाच वीज उपकेंद्रांना फटका

कणकवली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढल्यानंतर वादळाने गुरुवारी दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केला. वैभववाडी व कणकवली तालुक्यात अक्षरश: थैमान घातल्याने या दोन्ही तालुक्यातील वीजपुरवठा ठप्प झाला आहे.

वीज वाहिन्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने वीजवाहिन्या तुटून विजेचे खांब कोसळले आहेत. दुपारी साडेचारच्या सुमारास आलेले वादळ सायंकाळी पावणे सात वाजेपर्यंत सुरूच होते. या वादळासोबत पाऊसही पडत होता.

कणकवली विभागात वादळामुळे शंभराहून अधिक विजेचे खांब पडले असून असलदे, कनेडी, खारेपाटण, फोंडाघाट या ३३/११ केव्ही वीज उपकेंद्राचा पुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

वादळी वाऱ्यासह पावसामुळे झालेल्या नुकसानीची नेमकी आकडेवारी शुक्रवारीच स्पष्ट होऊ शकणार आहे. वादळ कमी होताच महावितरणने वीज पुरवठा सुरू करण्यासाठी विविध वाहिन्यांवर पडलेली झाडे व त्याच्या फांद्या हटविण्यास सुरुवात केली होती.

गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या संततधार पावसाचा वीज वितरण कंपनीला फटका बसला. वीज वाहिन्यांवर, खांबांवर झाडे उन्मळून पडल्याने खारेपाटण, असलदे, कनेडी, फोंडा या उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. मात्र, वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा पूर्ववत केला.

नागरिकांना कडक उन्हाचा जोरदार तडाखा बसत असताना गुरुवारी सायंकाळी गडगडाटासह कोसळलेल्या पावसाच्या सरींमुळे कणकवली शहरासह तालुक्यात गारवा निर्माण झाला आहे. मात्र अचानक झालेल्या पावसाच्या आगमनामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली.

काही घरांच्या छप्पराचे पत्रे उडून गेले, तर पावसापूर्वीची कामे खोळंबल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. मात्र, येथील तहसील कार्यालयात सायंकाळी उशिरापर्यंत पावसाने कुठेही नुकसान झाल्याची नोंद नव्हती.

Web Title: Sindhudurg: Mahavitaran hit storm, rain damaged in Kankavali: Five power sub-stations hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.