सिंधुदुर्ग :ओसरगाव येथील आगीच्या घटनेची सखोल चौकशी करावी : उपरकर यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 02:11 PM2018-11-09T14:11:20+5:302018-11-09T14:12:34+5:30

मुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ओसरगाव येथील डेपोला लागलेली आग ही संशयास्पद आहे. केवळ विम्याचे पैसे मिळावेत म्हणून ही आग लावल्याची दाट शक्यता आहे. असा आरोप करतानाच या आगीच्या घटनेची सखोल चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

Sindhudurg: To make a deeper inquiry into the incident of fire in Oshgaon: Upkar demand | सिंधुदुर्ग :ओसरगाव येथील आगीच्या घटनेची सखोल चौकशी करावी : उपरकर यांची मागणी

सिंधुदुर्ग :ओसरगाव येथील आगीच्या घटनेची सखोल चौकशी करावी : उपरकर यांची मागणी

Next
ठळक मुद्देओसरगाव येथील आगीच्या घटनेची सखोल चौकशी करावी परशुराम उपरकर यांची मागणी

कणकवली : मुंबई -गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ओसरगाव येथील डेपोला लागलेली आग ही संशयास्पद आहे. केवळ विम्याचे पैसे मिळावेत म्हणून ही आग लावल्याची दाट शक्यता आहे. असा आरोप करतानाच या आगीच्या घटनेची सखोल चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाड़कर, शैलेंद्र नेरकर, मालवणकर आदी उपस्थित होते.
परशुराम उपरकर म्हणाले, या ठेकेदार कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना तिन दिवस सुट्टी दिली होती. हे कर्मचारी परप्रांतीय असून ते आपल्या गावी तिन दिवसात जावून येऊ शकत नाहीत ही सत्यस्थिती आहे. आगीची घटना घडली त्याठिकाणी साधारणतः 2000 कर्मचारी रहातात. मात्र घटनेच्या वेळी एकही कामगार तिथे उपस्थित नव्हता.

या आग लागलेल्या डेपोत महामार्गाच्या कामासाठी लागणारी स्पोटके, डिझेल, ऑईल साठा करून ठेवण्यात आले होते असे आता समोर येत आहे. मात्र या कंपनीने ज्वालाग्राही पदार्थ ठेवण्याची परवानगी संबधित प्रशासनाकडून घेतलेली आहे का? हे तपासणे आवश्यक आहे. याठिकाणी 500 टायर ठेवले असल्याचे सांगण्यात येते. मात्र, फक्त 100 गाड्यांचीच नोंद उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे केलेली आहे. त्यामुळे टायर बाबतचा कंपनीचा दावा बोगस आहे.

संबधित ठिकाणी कोणत्याही आग प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे आजुबाजूच्या गावातील लोकांना धोका निर्माण झाला होता. याचीही दखल घेणे आवश्यक आहे. बोर्डवे लगत असलेल्या क्रशरच्या ठिकाणी होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे आजुबाजूच्या परिसरातील घराना तडे गेले आहेत. या क्रशरच्या जागेची तात्पुरती बिनशेती परवानगी घेतलेली आढळत नाही. त्यामुळे एक प्रकारे येथील काम अनधिकृतच सुरु आहे.

पोलिसांनी ओसरगाव येथील आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमिवर टायरचे चलन , खरेदीची बिले, ओईलची बिले, स्पोटके साठवणुकीचा परवाना तपासण्याची गरज आहे. असे झाले तरच नेमके सत्य जनतेसमोर येईल.
यापूर्वीही महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने बेळणे ते कासार्डे पर्यन्तचा रस्ता अनेक ठिकाणी पावसाने खचल्याचे सांगत 98 कोटी रुपयांच्या विम्याचा दावा केला होता. आमच्या जागरूकपणामुळे त्याना ही विम्याची रक्कम मिळालेली नाही. असाच प्रयत्न दिलीप बिल्डकॉन करीत असल्याचे प्राथमिक चित्र तरी आग प्रकरणामुळे दिसत आहे.

सावंतवाड़ी तालुक्यातील सोनूर्ले येथील मायनिंग उत्खननामुळे तेथील ग्रामस्थाना त्रास सहन करावा लागत आहे. तेथील घराना तडे गेले आहेत. 2008 पासून परवाना घेता तिथे काम सुरु आहे. ओव्हरलोड वहातुक सुरु आहे. मात्र अधिकारी याची दखल घेताना दिसत नाहीत. ठेकेदार कंपन्यांनी अधिकाऱ्यांना आपल्या खिशात टाकल्यासरखी ही स्थिती आहे. त्यामुळे जनतेला कोणी वालीच उरलेला नाहीं असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.

Web Title: Sindhudurg: To make a deeper inquiry into the incident of fire in Oshgaon: Upkar demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.