सिंधुदुर्ग : मालवण पालिकेच्या विषय समिती सभापतींना मुदतवाढ, निवडणूक बिनविरोध, आप्पा लुडबे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 01:34 PM2018-01-08T13:34:47+5:302018-01-08T13:39:08+5:30

मालवण येथील पालिकेच्या विषय समिती सभापतिपदाची निवड अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली. यात आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक समितीच्या सभापतिपदी परशुराम उर्फ आप्पा लुडबे, बांधकाम नियोजन विकास समितीच्या सभापतिपदी सेजल परब, महिला बालकल्याण समितीच्या सभापतिपदी तृप्ती मयेकर तर उपसभापतिपदी पूजा सरकारे यांची निवड प्रांत तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांनी जाहीर केली.

Sindhudurg: Malavya Municipal Committee Subject Committee to extend the term of election, the election unopposed, the Appa Londebe | सिंधुदुर्ग : मालवण पालिकेच्या विषय समिती सभापतींना मुदतवाढ, निवडणूक बिनविरोध, आप्पा लुडबे कायम

मालवण विषय समिती सभापतीपदी निवड झालेल्या नगरसेवकांचा नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, भाजपचे नेते अतुल रावराणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Next
ठळक मुद्देविषय समिती सभापतिपदाची निवड अपेक्षेप्रमाणे बिनविरोध विषय समिती निवडीसंदर्भात मालवण येथील पालिका सभागृहात बैठक

मालवण : येथील पालिकेच्या विषय समिती सभापतिपदाची निवड अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली. यात आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक समितीच्या सभापतिपदी परशुराम उर्फ आप्पा लुडबे, बांधकाम नियोजन विकास समितीच्या सभापतिपदी सेजल परब, महिला बालकल्याण समितीच्या सभापतिपदी तृप्ती मयेकर तर उपसभापतिपदी पूजा सरकारे यांची निवड प्रांत तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांनी जाहीर केली. त्यामुळे सर्व विषय समितींच्या सभापतींना मुदतवाढ देण्यात आली आहे.

विषय समिती निवडीसंदर्भात शनिवारी येथील पालिका सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी मुख्याधिकारी रंजना गगे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, सुदेश आचरेकर, नितीन वाळके, आप्पा लुडबे, गणेश कुशे, मंदार केणी, दीपक पाटकर, यतीन खोत, पंकज सादये, आकांक्षा शिरपुटे, पूजा सरकारे, पूजा करलकर, सुनीता जाधव, तृप्ती मयेकर, ममता वराडकर, शीला गिरकर, दर्शना कासवकर आदी उपस्थित होते.

आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक सभापतिपदासाठी परशुराम लुडबे, बांधकाम नियोजन विकास समिती सभापतिपदासाठी सेजल परब, महिला बालकल्याण समिती सभापतिपदासाठी तृप्ती मयेकर, उपसभापतिपदासाठी पूजा सरकारे यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाले होते.

त्यामुळे या सर्वांची बिनविरोध निवड डॉ. सूर्यवंशी यांनी जाहीर केली. यात स्थायी समिती अध्यक्ष नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपाध्यक्ष राजन वराडकर हे काम पाहतील असे स्पष्ट करण्यात आले.

बांधकाम विकास समितीत सदस्य म्हणून गणेश कुशे, मंदार केणी, पाणीपुरवठा जलनि:स्सारण समितीत राजन वराडकर, पंकज सादये, दर्शना कासवकर, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक समितीत आकांक्षा शिरपुटे, ममता वराडकर, महिला बालकल्याण समितीत शीला गिरकर यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. निवडीनंतर सर्व नवनिर्वाचित सभापतींचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले.
 

Web Title: Sindhudurg: Malavya Municipal Committee Subject Committee to extend the term of election, the election unopposed, the Appa Londebe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.