सिंधुदुर्गातील बाजारपेठा २८ रोजी बंद ठेवणार, व्यापारी महासंघाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 01:36 PM2018-09-26T13:36:52+5:302018-09-26T13:39:19+5:30
भारतीय बाजारपेठेत थेट परकीय गुंतवणुकी विरोधात शुक्रवारी २८ सप्टेंबरला भारत बंद ठेवण्यात येणार आहे. सिंधुदुर्गातील बाजारपेठा देखील बंद यानिमित्त बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी कुडाळ येथे दिली आहे.
सिंधुदुर्ग : भारतीय बाजारपेठेत थेट परकीय गुंतवणुकी विरोधात शुक्रवारी २८ सप्टेंबरला भारत बंद ठेवण्यात येणार आहे. सिंधुदुर्गातीलबाजारपेठा देखील बंद यानिमित्त बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांनी कुडाळ येथे दिली आहे. अखिल भारतीय किरकोळ व्यापारी फेडरेशनचे उपाध्यक्ष ललित गांधी उपस्थित होते.
तायशेटे पुढे म्हणाले, २८ रोजी सिंधुदुर्गातील बाजारपेठ बंदला हॉटेल व्यावसायिक असोसिएशन, सुवर्णकार संघटना, केमीस्ट ड्रगिस्ट असोसिएशनने पाठींबा दिला आहे. या दिवशी वाहतूक व्यवस्था, पेट्रोलपंप सुरु राहणार आहेत.
शुक्रवारी भरणारे आठवडा बाजार शनिवारी भरविण्याचा व्यापारी महासंघाने निर्णय घेतला आहे. परकीय थेट गुंतवणुकीमुळे भारतातील छोटे व्यापारी देशोधडीला लागणार आहेत. निवडणुकीपूर्वी परकीय गुंतवणुकीला विरोध करणाऱ्या मोदी सरकारचा परकीय गुंतवणुकीला पाठींबा का ? असा सवालही व्यापारी महासंघाने उपस्थित केला.
सरकारच्या या निर्णयामुळे बेकारी वाढून भारतीय उत्पादक अडचणीत येणार आहेत. ग्राहकांना देखील भविष्यात याची झळ पोहचणार आहे, अशीही माहिती यावेळी तायशेटे यांनी दिली.