कम्युनिकेबल डिसीजेस लॅबोरेटरीबाबत महादेव जानकर यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गात बैठक
By admin | Published: May 17, 2017 03:22 PM2017-05-17T15:22:37+5:302017-05-17T15:22:37+5:30
मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धविकासाबाबत आढावा घेणार
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. १७ : पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर हे दिनांक १८ व १९ मे २0१७ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत.
बुधवार, दिनांक १७ मे रोजी सायं.५.५0 वाजता गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ (दाभोली) येथे आगमन व येथून शासकीय विश्रामगृह वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्गकडे प्रयाण. गुरुवार, दिनांक १८ मे रोजी सकाळी ८.00 वाजता ओरोस, जिल्हा सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी ९.३0 वाजता शासकीय, विश्रामगृह ओरोस, जिल्हा सिंधुदुर्ग येथे कम्युनिकेबल डिसीजेस लॅबोरेटरी सुरु करण्याबाबत बैठकीस उपस्थिती. सकाळी ११.00 शासकीय विश्रामगृह, ओरोस येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी १२.५0 वाजता मालवण येथे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या कार्यालयात आढावा बैठक. दुपारी १.५0 वाजता शासकीय विश्रामगृह तारकर्ली, जिल्हा सिंधुदुर्गकडे प्रयाण. राखीव व मुक्काम.
शुक्रवार, दिनांक १९ मे रोजी सकाळी १0.00 वाजतार् ंतारकर्ली येथून कणकवलीकडे प्रयाण. सकाळी ११.३0 वाजता कणकवली येथे जिल्हा दुग्धविकास अधिकारी कार्यालयास भेट व आढावा बैठक. दुपारी १२.00 वाजता वैभववाडीकडे प्रयाण. दुपारी १२.५0 वाजता वैभववाडी येथे जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयास भेट व विकास कामांचा आढावा. दुपारी २.00 वाजता येडगाव येथे आगमन व राखीव. दुपारी ३.00 वाजता येडगाव येथून कणकवली रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. दुपारी ४.00 वाजता कणकवली रेल्वेस्थानक येथून जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.