सिंधुदुर्ग :राम मंदिराच्या मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल : नारायण राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 05:19 PM2018-11-30T17:19:13+5:302018-11-30T17:21:22+5:30
उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल करत आहेत . सध्या महाराष्ट्र दुष्काळाने होरपळला आहे. मात्र याचे सोयर सुतक राज्यकर्त्यांना केवळ सत्ता भोगण्यातच मश्गूल आहेत, अशी जोरदार टीका विरोधकांवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी जाहीर सभेत केली.
सिंधुदुर्ग : मराठा समाजाचे आरक्षणाचे यश हे माझे आहे, त्याचे श्रेय मला राज्याने दिले आहे. चिपी विमानतळ व आडाळी एमआयडीसी हे प्रकल्प माझे आहेत. मंत्री केसरकर यांच्या कार्यकाळात जिल्हाचा विकास दहा वर्षे मागे गेला आहे. येथील रस्ते, आरोग्य, शिक्षण व्यवस्थेची दुर्दशा झाली आहे. त्यांनी आतापर्यंत केवळ जनतेला फसवी आश्वासने दिली आहे.
आम्ही जनतेत राहून काम करतो. उद्धव ठाकरे हे राम मंदिराच्या मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल करत आहेत . सध्या महाराष्ट्र दुष्काळाने होरपळला आहे. मात्र याचे सोयर सुतक राज्यकर्त्यांना केवळ सत्ता भोगण्यातच मश्गूल आहेत, अशी जोरदार टीका विरोधकांवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी जाहीर सभेत केली. बांदा कट्टा कॉर्नर येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने विश्वास यात्रेअंतर्गत जाहिर सभेत राणे बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, विकास कुडाळकर, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, अंकुश जाधव, संतोष नानचे, गुरुनाथ पेडणेकर जिल्हा परिषद सदस्या उन्नती धुरी, शर्वाणी गावकर, पंचायत समिती सदस्या मानसी धुरी, शेर्ले सरपंच उदय धुरी, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, उपसरपंच अक्रम खान, शहर अध्यक्ष जावेद खतीब, व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, सचिव सचिन नाटेकर ज्ञानेश्वर सावंत, सागर सावंत, संदिप बांदेकर, दीपक सावंत, श्याम मांजरेकर, अंकिता देसाई, समिक्षा सावंत, दशरथ घाडी, संतोष सावंत, अनिल पावसकर, चित्रा भिसे, प्रविण देसाई, मधुकर देसाई, गौरांग शेर्लेकर, साई धारगळकर, प्रविण पंडीत आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अन्वर खान व प्रास्ताविक शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत तर आभार गुरुनाथ सावंत यांनी केले. स्वाभिमान तालुका अध्यक्ष संजू परब, स्वाभिमान तालुका अध्यक्ष संजू परब, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, संदीप कुडतरकर, एकनाथ नाडकर्णी, जिल्हा बँक चेअरमन सतीश सावंत, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी विचार मांडले.
इन्सुली सोसायटी चेअरमन अजित कोठावळे, माजी सरपंच उत्कर्षा हळदणकर, गौरांग चव्हाण यानी महाराष्ट्र स्वाभिमान मध्ये जाहीर प्रवेश केला. राज्यस्तरीय भजन स्पर्धेत कोकण विभागात प्रथम श्री देव बांदेश्वर प्रासादिक महिला भजन मंडळाचा गौरव खासदार राणे यांच्या हस्ते करण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याबद्दल बांदा सकल मराठा समाजातर्फे खासदार नारायण राणे याचे पुष्पगुच्छ देऊन ऋणनिर्देश करण्यात आले यावेळी बांदा अध्यक्ष राजाराम सावंत, उपाध्यक्ष आनंद गवस, बाबा गाड, गुरुनाथ सावंत, दीपक सावंत आदी उपस्थित होते.
चांदा ते बांदा नसून चांदा ते वांदा
माजी खासदार निलेश राणे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. निलेश राणे म्हणाले की गृहमंत्र्यांच्या मतदार संघात गुन्हेगारी, विनयभंग यांसारखे प्रकार वाढले आहेत. चांदा ते बांदा ही फसवी योजना आणली आहे. खरं तर त्यांचे नामांकन चांदा ते वांदा ठेवले पाहिजे. केवळ आपल्या स्वार्थासाठी चिपी विमान भाड्याने उतरवले. मात्र आता धावपट्टीवर विमान नाही, तर आॅटोरिक्षा धावत आहे. दहावी नापास खासदार असणे, ही जिल्ह्याची शोकांतिका आहे.