सिंधुदुर्ग : खासदारांनी केली चिपी विमानतळाची पाहणी, अधिकाऱ्यांना काम पूर्ण करण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 02:41 PM2018-08-21T14:41:31+5:302018-08-21T14:45:53+5:30
चिपी विमानतळावर पहिले विमान १२ सप्टेंबरला उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळास भेट देत पाहणी केली. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला.
मालवण : चिपी विमानतळावर पहिले विमान १२ सप्टेंबरला उतरणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळास भेट देत पाहणी केली. यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला.
चिपी विमानतळाची पाहणी केल्यावर खासदार राऊत यांनी दूरसंचार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी या विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत चर्चा केली.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रकाश परब, जिल्हा परिषद सदस्य सुनील म्हापणकर, सुनील देसाई, जिल्हा परिषदेचे गटनेते नागेंद्र परब, तालुकाप्रमुख बाळा दळवी, सभापती बाळा परब, प्रसाद मोरजकर, सुकन्या नरसुले, सोमा घाडीगांवकर, योगेश तावडे, केळुस सरपंच, कोचरा सरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
पाट-परुळे -चिपी रस्ता साडेपाच मीटर रुंद करणे, दूरसंचारचा थ्रीजी मनोरा सुरू करणे, कुंभारमाठ ते चिपी विद्युत वाहिनी टाकणे, पाट व केळूस गावातील तलावातून पाणी चिपीला पुरवठा करणे, धावपट्टीचे अडीच किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून एक किलोमीटरची धावपट्टी नियोजित आहे. नोव्हेंबरपर्यंत किरकोळ असलेले काम पूर्ण करून नियमित विमान वाहतूक सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.