सिंधुदुर्ग : संगीत परीक्षा सुरळीत; उद्या लेखी, १३ उमेदवार अनुपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 03:40 PM2018-04-02T15:40:40+5:302018-04-02T15:40:40+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या रिक्त ७१ जागांपैकी बॅन्ड्समन पदासाठी रविवारी संगीत परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी १०६ उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी ९३ उमेदवारांनी उपस्थित रहात ही परीक्षा दिली असून ते ३ एप्रिल रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे एकूण १३४७ उमेदवार ३ एप्रिल रोजी होणारी लेखी परीक्षा देणार आहेत.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या रिक्त ७१ जागांपैकी बॅन्ड्समन पदासाठी रविवारी संगीत परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी १०६ उमेदवारांना बोलविण्यात आले होते. त्यापैकी ९३ उमेदवारांनी उपस्थित रहात ही परीक्षा दिली असून ते ३ एप्रिल रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे एकूण १३४७ उमेदवार ३ एप्रिल रोजी होणारी लेखी परीक्षा देणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस विभागाच्या रिक्त होणाऱ्या ७१ पोलीस शिपाई पदांसाठी राज्य शासनाच्या गृहविभागाने पोलीस भरतीचे आयोजन केले होते. या भरतीसाठी सिंधुदुर्गसह राज्यभरातून १० हजार २६९ अर्ज दाखल झाले होते.
१२ मार्च पासून प्रत्यक्ष पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. यात सुमारे ६ हजार २१८ उमेदवार पुढील फेरीत दाखल झाले होते. त्यानुसार मैदानी गुणांची यादी तयार करून ती प्रसिद्ध करण्यात आली होती.
दरम्यान, लेखी परीक्षेस १:१५ प्रमाणे बॅन्ड्समन पदासाठी १०६ तर पोलीस शिपाई पदासाठी १२४१ पात्र झालेल्या उमेदवारांची सामाजिक व समांतर आरक्षण यादी (कट आॅफ लिस्टसह) सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बॅन्ड्समनसाठी ८० गुणांची कट आॅफ लिस्ट लावण्यात आली आहे.
मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून कट आॅफ लिस्टनुसार आणि संगीत वाद्य परीक्षा दिलेले उमेदवार असे मिळून एकूण १३४७ उमेदवारांची पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे.
या १३४७ उमेदवारांची लेखी परीक्षा ३ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता येथील पोलीस कवायत मैदानावर होणार आहे. लेखी परीक्षेसाठी येताना शारीरिक चाचणीवेळी देण्यात आलेले ओळखपत्र, लेखी परीक्षेसाठी पॅड, काळ्या शाईचे बॉलपेन, दोन पासपोर्ट साईज फोटो, त्यासोबत विद्यालय किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र यापैकी एक ओळखपत्र आणावे, असे आवाहन पोलीस भरती समन्वयक हेमंतकुमार शहा यांनी केले आहे.
९३ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र
मैदानी परीक्षेत पात्र ठरलेल्या बॅन्ड्समन उमेदवारांची संगीत परीक्षा १ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता येथील पोलीस कवायत मैदानावर पार पडली. ही प्रात्यक्षिक संगीत परीक्षा बॅन्ड तज्ञ अधिकाऱ्यांच्या निवड समितीने घेतली. या परीक्षेसाठी बोलविण्यात आलेल्या १०६ उमेदवारांपैकी ९३ उमेदवार उपस्थित राहत त्यांनी ही परीक्षा दिली. हे ९३ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.