सिंधुदुर्गनगरी : थरारक पाठलाग करून आरोपीस पकडले - गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 06:01 PM2018-11-20T18:01:35+5:302018-11-20T18:02:55+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी मध्यरात्री तब्बल १८ कि.मी थरारक पाठलाग करून गोवा बनावटीची चोरटी वाहतूक करणाºया वेंगुर्ला-गवळवाडा येथील सिताराम देवजी साठे (३७) या संशयित आरोपीला १० लाख ४२ हजार
सिंधुदुर्गनगरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी मध्यरात्री तब्बल १८ कि.मी थरारक पाठलाग करून गोवा बनावटीची चोरटी वाहतूक करणाºया वेंगुर्ला-गवळवाडा येथील सिताराम देवजी साठे (३७) या संशयित आरोपीला १० लाख ४२ हजार ८०० रुपये मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या कारमध्ये विविध ब्रॅन्डचे दारूचे ४७ बॉक्स होते. ही कारवाई रात्री २ वाजता आंबोली चेकपोस्ट येथे करण्यात आली.
गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतुक होणार असल्याची माहिती खब-यांकडून मिळाली होती. त्या आधारे मंगळवारी रात्री उशिरा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक आंबोली बेळगाव रस्त्यावर दाणोली तिठा येथे जावून थांबले होते. काही मिनिटाच्या फरकाने बांदा दाणोली तिढा येथून एक कार वेगात जात असल्याचे निदर्शनास आले.
या कारला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला.मात्र भरारी पथकाच्या या इशा-याकडे कार चालकाने दुर्लक्ष करत आपल्या ताब्यातील वाहन सुसाट वेगाने पुढे नेले. त्यामुळे पथकाने त्वरीत खासगी वाहनाने कारचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. पळून जाणारा सुसाट वेगाने वाहन चालवत होता. अखेर १८ कि.मी. अंतर पाठलाग करत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पळून जाणाºया वाहनाच्या आडवे आपले वाहन घालून गाडी तपासणीसाठी थांबविली.
दहा लाखांचा मुद्देमाल ताब्यात
त्यात गोवा बनावटीच्या दारूचे तब्बल ४७ बॉक्स आढळून आले. या सर्व दारूची किंमत २ लाख ८२ हजार ८00 रुपये एवढी होते. तर कारची किंमत ७ लाख ५0 हजार असा एकूण १0 लाख ४२ हजार ८00 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून संशयीत आरोपी सिताराम साठे याला ताब्यात घेण्यात आले. ही घटना मंगळवारी रात्री दोन वाजता घडली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक यु. एस. थोरात, डी. एम. वायदंडे, जवान आर. डी. ठाकूर, एस. एस. पवार, एस. जी. मुपडे, एच.आर.वस्त यांनी केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने थरारक पाठलाग करून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाºयास अटक करत मुद्देमाल ताब्यात घेतला. छायाचित्रात संशयित आरोपीसह पथकातील अधिकारी व कर्मचारी दिसत आहेत. (छाया : गिरीश परब)