सिंधुदुर्गात माकडतापाची संख्या ३९ वर
By admin | Published: March 6, 2017 06:12 PM2017-03-06T18:12:53+5:302017-03-06T18:24:19+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा-सटमटवाडी येथील दोघांचा शुक्रवारीच माकडतापाने
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा-सटमटवाडी येथील दोघांचा शुक्रवारीच माकडतापाने (कॅसनूर फॉरेस्ट डिसीज) बळी घेतला होता. मात्र, सोमवारी या परिसरातील आणखी दोघांना या साथीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बांदा येथील या माकडतापाच्या बाधीत रुग्णांची संख्या आतापर्यंत ३९ वर पोहोचली आहे.
डिसेंबर २0१६ पासून या साथीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात थैमान घातले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अजूनही फारसी गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना शनिवारी रात्री ग्रामस्थांनी घेराओ घातला होता. दरम्यान, कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालयाची २0 जणांची दोन वैद्यकीय पथके बांदा परिसरात पोहोचली आहेत. जंगली भागातील विषाणूमुळे हा संसर्गजन्य दुर्मिळ आजार होतो.