सिंधुदुर्गात आठ टक्केच शेतकरी थकबाकीदार
By admin | Published: June 12, 2017 11:28 PM2017-06-12T23:28:25+5:302017-06-12T23:28:25+5:30
सिंधुदुर्गात आठ टक्केच शेतकरी थकबाकीदार
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २0१६ मध्ये सुमारे ४0 हजार शेतकऱ्यांना विविध बँकेमार्फत २0७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. पैकी कर्ज वाटपात एकट्या जिल्हा बँकेचा सिंहाचा वाटा होता. त्या वेळेस जिल्हा बँकेमार्फत ११0 कोटी रुपयांचे पीक कर्ज देण्यात आले होते. यातील तब्बल ९२ टक्के शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड केली आहे, तर उर्वरित ८ टक्के शेतकऱ्यांची वसुली सुरू आहे. जिल्ह्यात पीक कर्ज परतफेडीचे प्रमाण समाधानकारक आहेत. त्यामुळे शासनाने अल्पभूधारकांना जाहीर केलेल्या कर्ज माफीचा योग्य असा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार नसल्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी पीक कर्ज दिले जाते. यात मोठे शेतकरी, अल्प भूधारक आणि अत्यल्प भूधारकांना शेतीसाठी कर्ज दिले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत सुमारे ४0 हजार शेतकऱ्यांना ११0 कोटी रुपयांचे पीक कर्ज उपलब्ध करून )देण्यात आले होते. जिल्"ातील शेतकरी हा मेहनती असून आपली समाजातील पत संभाळणारा आहे. शेतकरी हा प्रमाणिकपणे आपले पीक कर्ज फेडत असतो. सिंधुदुर्ग जिल्"ात मोठ्या प्रमाणात पिक कर्ज घेतले जाते. मात्र त्याची परत फेड ही वेळीच केली जाते. सन २0१६ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत जिल्"ातील सुमारे ४0 हजार शेतकऱ्यांना ११0 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. यापैकी सुमारे ९२ टक्के शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड केली आहे. ८ टक्के शेतकऱ्यांचे कर्ज थकित आहे. परंतु ते ही वसूल होणार आहे. त्यामुळे शासनाने जाहिर केलेल्या अल्पभूधारक व गरजू शेतक-यांना कर्ज माफी चा फायदा मात्र येथील शेतक-यांना होणार नाही. झालाच तर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या शेतक-यांना होण्याची शक्यता आहे.
२३८ कोटी ६५ लाखाचे कर्ज वाटपचे उद्दिष्ट
२०१६ मध्ये जिल्"ातील ३९ हजार ७८८ शेतकऱ्यांना २०६ कोटी ९९ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले होते. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँक १०१ कोटी ५० लाख, राष्ट्रीयकृत बँका ९४ कोटी ९७ लाख, ग्रामीण बँक १७ कोटी यांचा समावेश होता. २०१७ साठी २३८ कोटी ६५ लाख रूपयांचे संभाव्य पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा बँक ९८ कोटी, राष्टीयकृत बँक ११९ कोटी ७५ लाख, ग्रामीण बँक ११ कोटी २० लाख तर इतर बँका ९ कोटी ७० लाख यांचा समावेश आहे.
प्रतिक्रिया...
९२ टक्के कर्ज भरणाऱ्यांना प्रौत्साहनपर अनुदान मिळावे
शासनाचा कर्ज माफी बाबतचा जीआर नाही. केवळ मंत्री व सुकाणू समिती यांच्यामध्ये निर्णय झाला आहे. स्वत:ची समाजातील पत सांभाळण्यासाठी येथील शेतकरी कोठूनही कर्ज भरतो. त्यामुळे जिल्"ातील थकित ८ टक्के शेतकऱ्यांची कर्ज माफी करतानाच ९२ टक्के प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळावा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून करणार. प्रमाणिकपणे कर्ज भरणाऱ्या ९२ टक्के शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळावे यासाठी आंदोलन करणार.
-सतीश सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष- सिंधुदुर्ग