सिंधुदुर्ग : परमेत मृत माकडे सापडणे सिलसिला कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 06:34 PM2018-05-07T18:34:20+5:302018-05-07T18:34:20+5:30
परमेत मृत माकड सापडण्याचा सिलसिला कायम असून माकडतापाच्या पार्श्वभूमीवर भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
दोडामार्ग : परमेत मृत माकड सापडण्याचा सिलसिला कायम असून माकडतापाच्या पार्श्वभूमीवर भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी आढळलेल्या मृत माकडाची सरपंच आनंद नाईक यांनी गोचिड फैलाव होण्याच्या भीतीने त्वरित विल्हेवाट लावली. यापुढे मृत माकडांची जबाबदारी शासनाने उचलावी, अशी मागणी सरपंच नाईक यांनी केली आहे.
परमे गावात मृत माकडांची संख्या पन्नासच्यावर पोहोचली आहे. सरपंच आनंद नाईक यांनी माकडे मृत होण्यामागची कारणे शोधा, अशी मागणी आरोग्य विभागाकडे वारंवार केली. त्यानंतर येथील माकडांवर मोठ्या प्रमाणात गोचिड आढळून आल्या.
त्यामुळे आरोग्य विभागाने परमे गावात माकडतापाविषयी प्रबोधनपर पावले उचलली. काही दिवसांनंतर जनजागृतीचा उपक्रम बंद करण्यात आल्याने सरपंच नाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय पुन्हा आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.