सिंधुदुर्ग : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २५ जणांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 03:17 PM2018-10-04T15:17:21+5:302018-10-04T15:33:02+5:30
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गतर्फे कणकवली येथे २५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील उपजिल्हा रुग्णालय, कॉलेज तसेच बाजारपेठेमधील तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानांवर जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.
सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गतर्फे कणकवली येथे २५ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील उपजिल्हा रुग्णालय, कॉलेज तसेच बाजारपेठेमधील तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानांवर जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली.
सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा २००३ अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली गेली. या पथकामध्ये आरोग्य विभाग व पोलीस खात्याचा समावेश होता.
या दंडात्मक कारावाई सोबतच संबंधित विक्रेत्यांना समज देण्यात आली. तसेच शाळा, कॉलेज व रुग्णालयाच्या आवारात तंबाखू व तंबाखू जन्य पदार्त विक्रीस पूर्णपणे बंदी असून तशी विक्री करताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पथकाने यावेळी दिला.