सिंधुदुर्ग : मालवणात अस्वच्छतेला मिळणार पूर्णविराम : आप्पा लुडबे यांचा विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 05:32 PM2018-11-03T17:32:34+5:302018-11-03T17:34:19+5:30
नगरपालिकेला गतवर्षी मिळालेल्या बक्षिसामुळे यावर्षीही जोमाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाच घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. पालिकेकडे चार रिक्षा टेम्पो उपलब्ध असून नव्याने पाच गाड्या आल्याने नऊ गाड्यांच्या सहाय्याने शहरातील कचरा स्वच्छतेच्या प्रश्नावर पूर्णविराम मिळणार आहे, असा विश्वास आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग : नगरपालिकेला गतवर्षी मिळालेल्या बक्षिसामुळे यावर्षीही जोमाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाच घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. पालिकेकडे चार रिक्षा टेम्पो उपलब्ध असून नव्याने पाच गाड्या आल्याने नऊ गाड्यांच्या सहाय्याने शहरातील कचरा स्वच्छतेच्या प्रश्नावर पूर्णविराम मिळणार आहे, असा विश्वास आरोग्य सभापती आप्पा लुडबे यांनी व्यक्त केला.
मालवण पालिकेतील सर्व नगरसेवकांनी याहीवर्षी स्पर्धेत सहभागी होण्याच एकमुखी निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाने २०१६ मध्ये स्वच्छ भारत अभियान जाहीर केले. संपूर्ण भारत स्वच्छ करण्याच्या महत्वाकांक्षी अभियानाचा चौथा टप्पा स्वच्छता सर्वेक्षण २०१९ या नावाने येत्या २ आॅक्टोबरपासून सुरू झाला आहे. त्यात हागणदारी मुक्ती बरोबरच ओला व सुका कचरा नागरिकांकडून वेगळा गोळा करून त्यावर प्रक्रिया करणे तसेच लोकसहभागातून शहर स्वच्छ करणे या तीन प्रमुख मुद्यांवर भर दिला जात आहे.
आरोग्य विभागाकडून घंटागाड्यांचे नियोजन
४० मजूर घेण्याचीही कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये दोन कामगार कार्यरत राहणार आहेत. उर्वरित सहा मजूर आडारी डंपिंग ग्राऊंड येथे वर्गीकरणाचे काम करणार आहेत. आडारी डंपिंग ग्राऊंड येथे गांडूळ खत व बायोगॅस प्रकल्पाचेही काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडून घंटागाड्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. कचरा कुंड्यांमध्ये प्रत्येक घराचा कचरा न जाता थेट घंटागाड्यांमध्ये येण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही लुडबे यांनी सांगितले.