सिंधुदुर्ग : कणकवलीतील उद्ध्वस्त व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी नियोजन सुरु : समीर नलावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:43 AM2018-11-17T11:43:50+5:302018-11-17T11:46:01+5:30

मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कणकवली बाजारपेठेत शंभर टक्के उध्वस्त होणाऱ्या तसेच फळे, फुले, भाजी विक्रेत्यांबरोबरच इतर व्यापाऱ्याचे पुनर्वसन करण्यासाठी आमचे नियोजन सुरु आहे. डी.पी. रोड जवळ नगरपंचायतीचे आरक्षण विकासक विकसित करीत आहे.

Sindhudurg: Planning for rehabilitation of destitute merchants in Kankavli: Sameer Nalawade | सिंधुदुर्ग : कणकवलीतील उद्ध्वस्त व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी नियोजन सुरु : समीर नलावडे

सिंधुदुर्ग : कणकवलीतील उद्ध्वस्त व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी नियोजन सुरु : समीर नलावडे

Next
ठळक मुद्देकणकवलीतील उद्ध्वस्त व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी नियोजन सुरु : समीर नलावडे डी.पी. रोडजवळ आरक्षण विकासक विकसित करण्याचे काम सुरु करणार

सिंधुदुर्ग : मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कणकवली बाजारपेठेत शंभर टक्के उध्वस्त होणाऱ्या तसेच फळे, फुले, भाजी विक्रेत्यांबरोबरच इतर व्यापाऱ्याचे पुनर्वसन करण्यासाठी आमचे नियोजन सुरु आहे. डी.पी. रोड जवळ नगरपंचायतीचे आरक्षण विकासक विकसित करीत आहे. या ठिकाणी दूकान गाळे तसेच कट्टे बांधण्यात येणार असून त्याठिकाणी संबधित व्यापारी तसेच विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यात येईल. असे कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.

कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बांधकाम सभापती अभिजीत मुसळे उपस्थित होते.

समीर नलावडे पुढे म्हणाले, कणकवली शहरातील व्यापारी, रिक्षा व्यावसायिक, झाडे अशा अनेक गोष्टी महामार्ग चौपदरीकरणात बाधित होत आहेत. त्यामुळे याबाबत राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्याबरोबर मुख्याधिकारी, नगरसेवक यांची आम्ही बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली . आमचे म्हणणे आम्ही मांडले.

त्यामध्ये कणकवली शहरातील जेवढी झाडे तोडली जातील त्याच्या दुप्पट झाडे लावली जाणार आहेत. त्यासाठी जागा नगरपंचायत उपलब्ध करून देणार आहे. नगरपंचायतीच्या मालकीचे विजेचे खांब काढून महामार्ग प्राधिकरणने ठेकेदाराच्या माध्यमातून आमच्या ताब्यात दिले आहेत. महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर पुन्हा विजेचे खांब ते उभारून देणार आहेत.

Web Title: Sindhudurg: Planning for rehabilitation of destitute merchants in Kankavli: Sameer Nalawade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.