सिंधुदुर्ग : आठ धुमस्वारांना पोलिसांचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 03:12 PM2018-12-08T15:12:42+5:302018-12-08T15:14:46+5:30
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाऱ्याविरुद्ध मालवण पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली. यात जणांवर दंडात्मक कारवाई केली. शहरात अल्पवयीन, महाविद्यालयीन विद्यार्थी दुचाकी भरधाव वाहने चालवीत असल्याच्या तक्रारी असल्याने त्यांच्यावरही या मोहिमेतंर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाऱ्याविरुद्ध मालवण पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली. यात जणांवर दंडात्मक कारवाई केली. शहरात अल्पवयीन, महाविद्यालयीन विद्यार्थी दुचाकी भरधाव वाहने चालवीत असल्याच्या तक्रारी असल्याने त्यांच्यावरही या मोहिमेतंर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे.
शहरात काही दुचाकीचालक परवान्याशिवाय वाहने चालवितात. शिवाय यात अल्पवयीन, महाविद्यालयीन विद्यार्थीही भरधाव वेगाने वाहने चालवित असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे केल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रेश्मा मोमीन, ए. एस. कवडे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने शहरात तपासणी मोहिम राबविली.
यात अनेक दुचाकीस्वारांकडे कागदपत्रे नसल्याने त्यांच्यावर कारवाई केली. ही मोहिम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.