Sindhudurg: त्या वादग्रस्त पोस्टच्या मुळाशी पोलीस जाणार, पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती

By अनंत खं.जाधव | Published: January 24, 2024 08:09 PM2024-01-24T20:09:15+5:302024-01-24T20:10:03+5:30

Sindhudurg News: सोशल मिडीयावर जी वादग्रस्त पोस्ट फिरत आहे.त्यावरून वेंगुर्ले व सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.ही पोस्ट जिथून व्हायरल झाली त्याच्या मुळाशी पोलिस यंत्रणा जाऊन शोध घेणार आहेत.

Sindhudurg: Police will go to the root of the controversial post, informed the Superintendent of Police | Sindhudurg: त्या वादग्रस्त पोस्टच्या मुळाशी पोलीस जाणार, पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती

Sindhudurg: त्या वादग्रस्त पोस्टच्या मुळाशी पोलीस जाणार, पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती

सावंतवाडी - सोशल मिडीयावर जी वादग्रस्त पोस्ट फिरत आहे.त्यावरून वेंगुर्ले व सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.ही पोस्ट जिथून व्हायरल झाली त्याच्या मुळाशी पोलिस यंत्रणा जाऊन शोध घेणार आहेत. तसेच यातील दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे सिंधुदुर्ग चे पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सांगितले ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.

तसेच जिल्ह्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी सर्वानी शांतता राखावी सिंधुदुर्ग चा सायबर सेल 24 तास काम करणार असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. व्हायरल पोस्ट वरून घडलेल्या प्रकारानंतर बुधवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्याला भेट दिली.व परस्थीतीचा आढावा घेतला तसेच अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या.

यावेळी पोलिस अधीक्षक म्हणाले, सावंतवाडी व वेंगुर्ले पोलिस ठाण्यात व्हायरल पोस्ट वरून गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात काही आरोपींना अटक ही करण्यात आली असून पोलिस योग्य तो तपास करतील असे स्पष्ट केले.तसेच या वादग्रस्त व्हायरल पोस्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात ही गुन्हे दाखल झाले  असल्याचे अधीक्षकांनी स्पष्ट केले.असून या प्रकरणातील मुख्य सुत्रधारा पर्यत पोलिस नक्कीच पोचतील सायबर सेल पूर्ण पणे यामागे लागला असल्याचा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी करावा त्यातून कोणताही चुकीचा संदेश व्हायरल होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे चुकीच्या संदेशामुळे दोन समाज्यात तेढ  निर्माण होणार नाही हे बघितले पाहिजे असे ही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

महाविद्यालयात पुन्हा एकदा सायबर जनजागृती मोहीम 
हा सर्व प्रकार महाविद्यालयीन मुलाच्या हातून घडत आहे.असेच तपातून दिसून येत आहे.त्यामुळे गरज भासल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात सायबर जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.असेही अधीक्षकांकडून स्पष्ट करण्यात आले.

व्हायरल पोस्ट च्या मुळाशी जाणार 
वादग्रस्त व्हायरल पोस्ट वरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गुन्हे दाखल झाले आहेत त्यामुळे या वादग्रस्त व्हायरल पोस्ट च्या मुळाशी पोलिस जाऊन तपास करतील आणि दोषींना अटक करतील असे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

Web Title: Sindhudurg: Police will go to the root of the controversial post, informed the Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.