सिंधुदुर्ग : माणगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा, एक लाखावर मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 03:16 PM2018-04-30T15:16:26+5:302018-04-30T15:16:26+5:30
माणगाव येथे भर बाजारपेठेत सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या १० जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल १ लाख ७ हजार ७२६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या दहा जणांना जामिनावर सोडण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. जुगार खेळणाऱ्यांमध्ये माणगावातील काही प्रतिष्ठीत ग्रामस्थ असल्याची चर्चा आहे.
कुडाळ : माणगाव येथे भर बाजारपेठेत सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या १० जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल १ लाख ७ हजार ७२६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या दहा जणांना जामिनावर सोडण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. जुगार खेळणाऱ्यांमध्ये माणगावातील काही प्रतिष्ठीत ग्रामस्थ असल्याची चर्चा आहे.
तालुक्यातील माणगाव परिसरात अवैध धंद्यांना जोर आला आहे. शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी भर बाजारपेठेत लक्ष्मी बेकरीच्या जवळ सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकला. या कारवाईत दोन दुचाकी, दोन मोबाईल तसेच जुगार खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्यासह रोख रक्कम असे मिळून १ लाख ७ हजार ७२६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलिसांनी नियोजनबद्ध छापा टाकल्याने एकाही जुगाऱ्याला पळण्याची संधी मिळाली नाही. जुगार खेळणाऱ्यांमध्ये विनायक उर्फ ईनबा कुडतरकर (माणगाव), उमेश सखाराम भिसे (माणगाव), सुधीर केशव ताम्हाणेकर (गोठोस), अशोक वामन हळदणकर (माणगाव), सुनील वामन हळदणकर (माणगाव), विष्णू बाबुराव सुतार (माणगाव), सुभाष बाळाजी सावंत (माणगाव), काशिनाथ सुरेश घोगळे (वाडोस), गंगाराम यशवंत म्हाडगुत (वाडोस), तुकाराम रामचंद्र धुरी (माणगाव) यांचा समावेश आहे.
या दहा जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. याबाबत पोलीस कर्मचारी सिध्दार्थ प्रभूतेंडोलकर यांनी तक्रार दिली आहे.