सिंधुदुर्ग : मालवणात नागरिकांचे कंदील आंदोलन, बंद पथदीपांबाबत निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 02:22 PM2018-06-04T14:22:54+5:302018-06-04T14:22:54+5:30

मालवण शहरात अनेक ठिकाणचे पथदीप बंद असल्याने व रस्ते अंधारमय बनले असल्याने मालवण तालुका काँग्रेसचे सरचिटणीस अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी अनोखे कंदील आंदोलन छेडले. नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांनी पथदीप प्रश्नावर लक्ष न पुरविल्यानेच कंदील आंदोलन करण्याची वेळ आल्याचे नागरिकांनी सांगितले.

Sindhudurg: In protest against the lantry movement of the people, the street lanterns in the city | सिंधुदुर्ग : मालवणात नागरिकांचे कंदील आंदोलन, बंद पथदीपांबाबत निषेध

मालवण शहरात पथदिवे बंद असल्याच्या निषेधार्थ अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी अनोखे कंदील आंदोलन छेडले.

Next
ठळक मुद्देमालवणात नागरिकांचे कंदील आंदोलन, बंद पथदीपांबाबत निषेध  नगरपालिकेकडून केवळ दिवाबत्ती कर वसुली

मालवण : शहरात अनेक ठिकाणचे पथदीप बंद असल्याने व रस्ते अंधारमय बनले असल्याने मालवण तालुका काँग्रेसचे सरचिटणीस अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी अनोखे कंदील आंदोलन छेडले. नगरपरिषदेतील सत्ताधाऱ्यांनी पथदीप प्रश्नावर लक्ष न पुरविल्यानेच कंदील आंदोलन करण्याची वेळ आल्याचे नागरिकांनी सांगितले.

नगरपरिषद नागरिकांकडून रस्त्यावरील दिवाबत्तीकरिता कर वसुली करते. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यावरील लाईट अनेकवेळा बंद असते. यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलावर्ग यांना बॅटºया घेऊन रस्त्याने जावे लागते. त्यामुळे लाखो रुपये खर्चून शहरात बसविण्यात आलेल्या प्रखर झोतातील पथदीपांचा उपयोग काय? असा प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्थित केला.

या आंदोलनात काँग्रेस तालुका सरचिटणीस अरविंद मोंडकर, महेश लुडबे, गजानन मसुरकर, शमिका लाड, सुप्रिया खोत, विद्या खोत, कांचन मसुरकर, संध्या मसुरकर, सुभाष कुमठेकर, नाना आचरेकर, महेश बांदिवडेकर, गौरी कुमामेकर आदींसह अन्य नागरिक सहभागी झाले होते.


सत्ताधाऱ्यांनी लक्ष न दिल्याने आंदोलनाची वेळ

पथदीपप्रश्नी मालवण नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी कोणतेही लक्ष दिले नाही. परिणामी कंदील आंदोलन करण्याची वेळ आली असे नागरिकांनी यावेळी सांगितले. यावेळी नागरिकांनी अंधारमय रस्त्यावर कंदील पेटवून आपला संताप व्यक्त केला. पावसाळ्याच्या सुरूवातीलाच अशी वेळ येत असेल तर पावसाळ्याचे चार महिने कसे जातील, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.

 

Web Title: Sindhudurg: In protest against the lantry movement of the people, the street lanterns in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.