सिंधुदुर्ग : बहुजन क्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 04:43 PM2018-01-23T16:43:57+5:302018-01-23T16:46:25+5:30
कोरेगाव-भीमा येथील दंगलीस कारणीभूत असलेल्यांना पोलीस व राज्य शासनाकड़ून संरक्षण देऊन जातीय वैमनस्य निर्माण करणाऱ्या राज्य सरकार व पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
सिंधुदुर्गनगरी : कोरेगाव-भीमा येथील दंगलीस कारणीभूत असलेल्यांना पोलीस व राज्य शासनाकड़ून संरक्षण देऊन जातीय वैमनस्य निर्माण करणाऱ्या राज्य सरकार व पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना सादर करण्यात आले. यावेळी बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीचे अॅड. एस. व्ही. कांबळे, व्ही. बी. जाधव, प्रसाद जळवी, चेतन जाधव, शैलेश कदम, मनोज जाधव, सचिन जाधव आदी समाज बांधव उपस्थित होते.
राज्य शासनाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यशासन जातीय वैमनस्य निर्माण करतेय....
द्विशताब्दी वर्षानिमित्त १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा रणसंग्रामातील शहिदांना सलामी देण्यासाठी जमलेल्या जमावावर भ्याड हल्ला झाला होता. मात्र हल्ल्याला कारणीभूत असणाऱ्यांना पोलीस अटक करत नाहीत, उलट त्यांना संरक्षण दिले जात आहे.
शांततापूर्वक निषेधार्थ बंद पाळणाऱ्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, कोंम्बिंग आॅपरेशनच्याद्वारे पोलीस व राज्य शासनातर्फे निरपराध तरुणांवर अटक सत्र चालविणे, या भ्याड हल्ल्यात बळी ठरलेल्या लोकांच्या तक्रारी पोलिसांकडून दाखल करून न घेणे तसेच या हल्ल्यास कारणीभूत असलेल्या व्यक्तींना राज्य शासन व पोलीस यंत्रणा संरक्षण देऊन जातीय वैमनस्य निर्माण करत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.