सिंधुदुर्ग : विचार पटत नसतील तर राणेनी खासदारकीचा राजीनामा द्यावा :  राजन तेली यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 05:17 PM2018-12-04T17:17:35+5:302018-12-04T17:20:16+5:30

जर भाजप व नरेंद्र मोदींचे विचार पटत नसतील तर स्वाभिमान दाखवून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि खुशाल टिका करावी. असा टोला भाजप प्रदेश चिटणीस माजी आमदार राजन तेली यांनी लगावला आहे.

Sindhudurg: Ranee MPs should resign if views are not considered: Rajan Teli | सिंधुदुर्ग : विचार पटत नसतील तर राणेनी खासदारकीचा राजीनामा द्यावा :  राजन तेली यांचा टोला

सिंधुदुर्ग : विचार पटत नसतील तर राणेनी खासदारकीचा राजीनामा द्यावा :  राजन तेली यांचा टोला

Next
ठळक मुद्देविचार पटत नसतील तर राणेनी खासदारकीचा राजीनामा द्यावा राजन तेली यांचा कणकवली पत्रकार परिषदेत टोला

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विश्वास यात्रेच्यावेळी भाषण करताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपवर टिका केली.

एकीकडे भाजपच्या तिकिटावर खासदार व्हायचे आणि दुसरीकडे त्यांचीच उणीदूणी काढायची हे योग्य नव्हे. त्याना जर भाजप व नरेंद्र मोदींचे विचार पटत नसतील तर स्वाभिमान दाखवून त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि खुशाल टिका करावी. असा टोला भाजप प्रदेश चिटणीस माजी आमदार राजन तेली यांनी लगावला आहे.

कणकवली येथील भाजप संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल उपस्थित होते.

यावेळी राजन तेली म्हणाले, विश्वास यात्रेत नारायण राणे यांनी सरकारवर टिका करताना सांगितले की , सी-वर्ल्ड व रेडी पोर्ट प्रकल्प मी आणला तो यांनी बंद पाडला. चिपी विमानतळाचेही तसेच आहे. आडाळी एमआयडीसी , आयटीपार्कही आणले होते. हे सर्व प्रकल्प बंद केले आहेत. मात्र, 14 वर्षे नारायण राणे पालकमंत्री होते. त्या काळात यापैकी एक तरी प्रकल्प त्यांनी स्वतः पूर्ण का केला नाही? एखादा प्रकल्प पुर्ण व्हायला कितिसा काळ लागतो? असा प्रश्नही तेली यांनी यावेळी उपस्थित केला.

राजन तेली म्हणाले, नारायण राणे यांचा एक पुत्र काँग्रेस आमदार, दुसरा स्वाभिमान पक्षाचा सरचिटणीस तर ते स्वतः भाजपचे खासदार आहेत. याला नेमके काय म्हणायचे?

पाटबंधारे प्रकल्प बंद असल्याचे ते सांगत आहेत. पण 1999 मध्ये ते पालकमंत्री असताना जिल्ह्यात वनसंज्ञा लागली. त्यामुळे नरडवे, सरंबळ, टाळंबा असे प्रकल्प रखडल्याने त्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. ते प्रकल्प रखडले आहेत. आता या वनसंज्ञेचे पाप कोणाच्या पदरात घालायचे? हे त्यानी सांगावे.

सि-वर्ल्ड प्रकल्पाला मंजूरी मिळाली होती तर ते पालकमंत्री असताना त्याचे काम का सूरू झाले नाही ? रेडी पोर्टची विकासक असलेली जॉन अर्नेस कंपनी 5000 कोटि रूपये खर्च करणार होती. त्या कंपनीने एक तरी नवीन विट तिथे लावली आहे का? तेथील जेटी वरुन करोड़ो रूपये कमावले. त्याठिकाणी फक्त स्वाभिमानच्या कार्यकर्त्याना ' लोडिंग , अनलोडिंगचे' काम मिळाले आहे. इतर जनतेला काय फायदा झाला?

आता असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री हे अकार्यक्षम आहेतच. पण चिपी विमानतळ तसेच इतर प्रकल्पांची जबाबदारी नारायण राणे यांची नाही का ? 2014 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आडाळी एमआयडीसीची घोषणा करण्यात आली. परंतु अगोदर पासून अस्तित्वात असलेल्या कुडाळ येथील एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग का सुरु करण्यात आले नाहीत.

भाजप शासनाच्या कालावधीत केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितिन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राष्ट्रिय महामार्ग चौपदरीकरणाची जनतेची मागणी पूर्ण होत आहे. रेल्वे मार्ग दुपदरीकरण, नवीन रेल्वे स्थानके, नवीन टर्मिनल, वैभववाडी ते कोल्हापुर व चिपळूण ते कराड रेल्वेमार्गाला आर्थिक तरतुदीसह मंजूरी देण्यात आली आहे.

असे अनेक प्रकल्प भाजप मुळे लोकांसाठी खुले झाले आहेत. मुख्यमंत्र्यानी अभ्यासपूर्वक मराठा आरक्षण दिले आहे. आयुष्यमान भारत सारखी सर्वात मोठी योजना पंतप्रधानानी आणली आहे. याचा राणे यांनी विचार करावा.

भाजपची लोकप्रियता आता कोकणातही वाढायला लागली आहे. त्यामुळे कोकणात तसेच राज्यात अनेक नगरपालिका, ग्रामपंचायती व इतर स्थानिक स्वराज्य संस्थावर भाजपची सत्ता आहे. भाजपने विकास केला .असे सांगून जनता मतदानाच्या रूपाने विश्वास दाखवित आहे.असेही राजन तेली यावेळी म्हणाले.

त्यांच्या नवीन वाटचालीस शुभेच्छा!

नारायण राणे यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. त्यामुळे ते काही वेगळा निर्णय घेत असतील तर त्यांच्या नवीन वाटचालीस आमच्या शुभेच्छा.असे राणे व शरद पवार यांच्या भेटी संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राजन तेली यांनी उत्तर दिले.

Web Title: Sindhudurg: Ranee MPs should resign if views are not considered: Rajan Teli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.