सिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:57 AM2019-09-10T11:57:20+5:302019-09-10T11:59:17+5:30

गणेशोत्सवानंतर आता सिंधुदुर्ग वासीयांना महालयाचे वेध लागले आहेत. अद्याप अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचे काही दिवस शिल्लक असले तरी महालयासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदी बरोबरच इतर तयारी सुरू झाली आहे.

Sindhudurg residents now look at the palace! | सिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध !

सिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध !

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध !साहित्याच्या खरेदी बरोबरच इतर तयारी सुरू

कणकवली : गणेशोत्सवानंतर आता सिंधुदुर्ग वासीयांना महालयाचे वेध लागले आहेत. अद्याप अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचे काही दिवस शिल्लक असले तरी महालयासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदी बरोबरच इतर तयारी सुरू झाली आहे.

गणेश चतुर्थी दीवशी गणरायांची विधिवत स्थापना केल्यानंतर दीड , पाच ,सात , नऊ दिवसांनी अनेक ठिकाणी गणरायांना निरोप देण्यात आला आहे. १२ सप्टेंबर रोजी अकरा दिवसांच्या गणरायाना निरोप देण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी सतरा, एकविस, बेचाळीस दिवसानीही गणेशाचे विसर्जन केले जाणार आहे.

मात्र, सिंधुदुर्गात महालयांना विशेष महत्त्व असते. पितृ पंधरवड्यात आपल्या मृत कुटुंबीयांच्या नावे तिथीनुसार पिंडदान करुन पितरांच्या आत्मांना शांती मिळण्यासाठी धार्मिक विधी केले जातात. तर पितरांच्या नावाने नातेवाईक व ग्रामस्थांना महाप्रसाद वाढला जातो.

पितृपक्ष कालावधीत पितर धरतीवर येतात, त्यांना तृप्त केल्यास वर्षभर आपल्या कामांना गती मिळते अशी अनेक लोकांची श्रद्धा आहे. यावर्षी १४ सप्टेंबर पासून महालयानां प्रारंभ होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर आता लोकांना महालयाचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने तयारी सुरु झाली आहे.

गणेश दर्शनासाठी येणाऱ्या जवळच्या नातलगांना या महालयासाठी निमंत्रण दिले जात आहे. तसेच यासाठी सामानाची यादी बनवून ते खरेदी करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. या विधीसाठी लागणाऱ्या वस्तूंची जुळवाजुळव करणे सुरू आहे.

पुरोहितांना निमंत्रण देणे तसेच महालयाशी संबंधित इतर अनेक कामांना सुरुवात करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी आपल्या मुळ गावी आलेले अनेक मुंबईकर महालय करुनच परतणार आहेत. त्यांची त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.

Web Title: Sindhudurg residents now look at the palace!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.