सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावरील दिशादर्शक फलक झाडीत लपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 02:10 PM2018-09-19T14:10:14+5:302018-09-19T14:14:36+5:30
मुंबई-गोवा महामार्गावरील दिशादर्शक फलक सध्या झाडी झुडपात झाकून गेले असून काही दिशादर्शक फलकाची चौपदरीकरणारच्या कामात नासधूस झाली आहे. सध्या चौपदरीकरणाचे काम असताना मुंबई-गोवा महामार्गावरुन जाणाऱ्या पर्यटकांना मार्ग समजण्यास कठीण जात आहे. या फलकावरील झाडी झुडपे हटविण्याची मागणी नागरीक व वाहनचालकांकडून केली जात आहे.
नांदगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील दिशादर्शक फलक सध्या झाडी झुडपात झाकून गेले असून काही दिशादर्शक फलकाची चौपदरीकरणारच्या कामात नासधूस झाली आहे. सध्या चौपदरीकरणाचे काम असताना मुंबई-गोवा महामार्गावरुन जाणाऱ्या पर्यटकांना मार्ग समजण्यास कठीण जात आहे. या फलकावरील झाडी झुडपे हटविण्याची मागणी नागरीक व वाहनचालकांकडून केली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला असताना महामार्गाच्या बाजूला असणाऱ्या दिशादर्शक फलकाकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या पावसाळ्यात झाडी झुडपे वाढल्याने त्यांनी दिशादर्शक फलकावर पसरल्या आहेत. त्यामुळे पर्यटक व वाहनचालकांना धोकादायक ठिकाण, स्पीड ब्रेकर, वाहनांचा वेग, मार्ग दाखविणारे फलक दिसत नाहीत. गणेशोत्सवाच्या दरम्यान येणारे नवीन चालक व पर्यटक यांना वाहने हाकताना अडचण निर्माण होत आहे.
तसेच काही ठिकाणी महामार्ग चौपदरीकरण सुरु असताना लाखो रुपये खर्च करुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने लावण्यात आलेल्या फलकाची झाडे व खोदाई करताना नासधूस झालेली आहे. त्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय झाला आहे. दिशादर्शक फलकावर वाढलेली झाडी हटविण्यात यावी व दिशादर्शक फलकाची झालेल्या नुकसानीची योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी वाहन चालक व नागरिकांतून होत आहे.