सिंधुदुर्ग : आंबोलीजवळ सावंतवाडी-पुणे शिवशाही-टेम्पो यांच्यामध्ये अपघात, तिघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:55 PM2018-03-12T13:55:28+5:302018-03-12T13:55:28+5:30
आंबोली मुख्य धबधब्याजवळ आज, सोमवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सावंतवाडीहून पुण्याच्या दिशेने जाणारी सावंतवाडी-पुणे ही शिवशाही बस आणि टाटा एस भाजी वाहतूक करणारा टाटा एस टेम्पो यांच्यामध्ये समोरासमोर टक्कर होऊन तिघेजण गंभीर जखमी झाले.
आंबोली : आंबोली मुख्य धबधब्याजवळ आज, सोमवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सावंतवाडीहून पुण्याच्या दिशेने जाणारी सावंतवाडी-पुणे ही शिवशाही बस आणि टाटा एस भाजी वाहतूक करणारा टाटा एस टेम्पो यांच्यामध्ये समोरासमोर टक्कर होऊन तिघेजण गंभीर जखमी झाले.
आज सकाळी शिवशाही बस (क्रमांक 47८0301 ) ही आंबोलीच्या दिशेने सुसाट येत होती, एका धोकादायक वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला व र्विरुद्ध दिशेने जात चालकाने बस टाटा एस या गाडीवर आदळली. हा अपघात इतका गंभीर होता की टाटा एस या गाडीचा समोरील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
टाटा एस क्रमांक (क्रमांक 09 9120 ) मधील रमेश शिवाप्पा कांबळे (वय तीस, राहणार कसबा हेब्बाळ- गडहिंग्लज), शांताबाई नाईक हे गंभीर जखमी झाले. यात रमेश शिवापा कांबळे यांच्या पायाला व हाताला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या मागे बसलेल्या जावेद लबतुरे यांच्याही पायाला दुखापत झाली.
त्याचा सोबत असलेल्या हसीना लांबतुरे हिलाही किरकोळ दुखापती झाल्या अपघाताची भीषणता बघता अपघातात कुणीही वाचले नसेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु सुदैवाने या अपघातात कोणीही मृत्यूमुखी पडले नाही.
गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी सावंतवाडी तसेच गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक विश्वास सावंत व दत्त गुरू कलगोंडा करत आहेत.
आंबोली मार्गे ही बस पुण्याला नेहमी जात असते, बस घाट मार्गावरून नेहमी सुसाट असते, अशी इतर वाहन चालकांची तक्रार होती. या बसवरील चालक हे महामंडळाचे प्रशिक्षित चालक नसून ते कॉन्ट्रॅक्टवर रुजू झालेले चालक असल्याने हे चालकनिपूण नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे अपघात ओढावत असल्याचा आरोप होत आहे .त्यामुळे या बसमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत .