सिंधुदुर्ग : सावंतवाडीत पुन्हा फ्लॅट फोडला, शहरात चोरीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 04:01 PM2018-05-08T16:01:29+5:302018-05-08T16:01:29+5:30
सावंतवाडी शहरातील सर्वोदयनगर येथील चोरीचा तपास शून्य असतानाच सोमवारी त्याच परिसरातील इमारतीमधील अन्य एकाचा बंद फ्लॅट फोडल्याचे समोर आले. ही घटना शुक्रवारी रात्रीचीच असून, संबंधित फ्लॅट मालक सोमवारी सावतवाडीत आल्यावर हा प्रकार समोर आला. याबाबत पोलिसांनी पंचनामा करून चोरीची नोंद केली आहे.
सावंतवाडी : शहरातील सर्वोदयनगर येथील चोरीचा तपास शून्य असतानाच सोमवारी त्याच परिसरातील इमारतीमधील अन्य एकाचा बंद फ्लॅट फोडल्याचे समोर आले. ही घटना शुक्रवारी रात्रीचीच असून, संबंधित फ्लॅट मालक सोमवारी सावतवाडीत आल्यावर हा प्रकार समोर आला. याबाबत पोलिसांनी पंचनामा करून चोरीची नोंद केली आहे.
दरम्यान, या चोरीप्रकरणी पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज आले असले तरी पोलीस चोरट्यांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरले आहे. मात्र, या चोरीचा तपास सुरू असतानाच चोरट्यांनी त्याच दिवशी त्याच परिसरातील अन्य एका इमारतीतील फ्लॅट फोडल्याचे समोर आले असून, संबंधित मालकाने याबाबत पोलिसांत धाव घेतली.
या चोरीत घरात दागिने असतानाही चोरट्यांच्या हाताला ते लागले नाहीत. शिवाय लॅपटॉप आदी वस्तूलाही चोरट्यांनी हात लावला नसल्याचे संबंधित फ्लॅट धारकांनी पोलिसांत दिलेल्या माहितीत सांगितले. याबाबत पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
सावंतवाडी-सालईवाडा येथील राजरत्न कॉम्प्लेक्स व ज्युलिएट कॉम्प्लेक्समधील एकूण पाच फ्लॅट तिघा अज्ञात चोेरट्यांनी फोडले होते. या चोरीत चोरट्यांच्या हातात काहीच लागले नसले, तरी याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.