सिंधुदुर्ग :  केसरी उपसरपंचांचा शिवसेनेला रामराम, समाज बांधवांवर अन्याय करीत असल्याचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:02 PM2018-11-06T12:02:37+5:302018-11-06T12:03:48+5:30

केसरी अलाटी येथे धनगर बांधवांनी बांधलेल्या घरांना अद्याप घर नंबर मिळाले नाहीत. मात्र, आता आपल्या बांधवांवर ग्रामपंचायत अन्याय करीत असल्याचा ठपका ठेवत केसरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच भरत गोरे यांनी आपण कार्यकर्त्यांसह शिवसेनेतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. याबाबतचे पत्रक भरत गोरे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

Sindhudurg: Shivsena R Ramram, the Kesari sub-district, is doing injustice to the society | सिंधुदुर्ग :  केसरी उपसरपंचांचा शिवसेनेला रामराम, समाज बांधवांवर अन्याय करीत असल्याचे मत

केसरी अलाटी येथील धनगर बांधवांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे.

Next
ठळक मुद्देकेसरी उपसरपंचांचा शिवसेनेला रामराम समाज बांधवांवर अन्याय करीत असल्याचे मत

सावंतवाडी : केसरी अलाटी येथे धनगर बांधवांनी बांधलेल्या घरांना अद्याप घर नंबर मिळाले नाहीत. मात्र, आता आपल्या बांधवांवर ग्रामपंचायत अन्याय करीत असल्याचा ठपका ठेवत केसरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच भरत गोरे यांनी आपण कार्यकर्त्यांसह शिवसेनेतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. याबाबतचे पत्रक भरत गोरे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मी सतत शिवसेनेच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी झटत आहे. मात्र माझीच ग्रामपंचायत आमच्या समाज बांधवांवर अन्याय करीत आहे. हा अन्याय चुकीचा आहे. गेली अनेक वर्षांपासून धनगर समाजबांधव सर्व सुखसोयींपासून वंचित आहेत. तसेच आता घरांना नंबर देण्यावरून या ग्रामपंचायतीमध्ये मी उपसरपंच असताना आम्हांला डावलले जात आहे.

त्यामुळे मी माझ्या सर्व धनगर बांधवांच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत माझे म्हणणे मांडले. जर समाजावर अन्याय होत असेल तर शिवसेनेत थांबणे चुकीचे असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे. तसेच शिवसेनेतून बाहेर पडा, असे मला सांगण्यात आले. त्यामुळे मी शिवसेनेतून बाहेर पडत आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.

या बैठकीवेळी जनार्दन गोरे, तातू वरक, धुळू डोईफोडे, नागेश पाटील, नितीन वरक, लक्ष्मण जंगले, बाबू लांबर, प्रकाश पाटील, बाबू पाटील हे उपस्थित असल्याचेही पत्रकात म्हटले आहे. मात्र, गोरे हे कोणत्या पक्षात जाणार याची घोषणा करण्यात आलेली नाही.
 

Web Title: Sindhudurg: Shivsena R Ramram, the Kesari sub-district, is doing injustice to the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.