सिंधुुदुर्ग : सोनवडे घाटमार्गासाठी आत्मदहनाचा इशारा, प्रशासनाला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 02:25 PM2018-05-19T14:25:02+5:302018-05-19T14:25:02+5:30
गेली चाळीस वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही घाटमार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नसेल तर जगण्यातही काहीही अर्थ नाही. नैराश्याने आम्हाला घेरले आहे. म्हणून ३१ मे रोजी सोनवडे घाटमार्गाच्या पायथ्याशी आत्मदहन करणार असल्याचा इशारा पत्रकाद्वारे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी प्रशासनाला दिला.
सिंधुुदुर्ग : गेली चाळीस वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही घाटमार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नसेल तर जगण्यातही काहीही अर्थ नाही. नैराश्याने आम्हाला घेरले आहे. म्हणून ३१ मे रोजी सोनवडे घाटमार्गाच्या पायथ्याशी आत्मदहन करणार असल्याचा इशारा पत्रकाद्वारे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी प्रशासनाला दिला. यावेळी उपस्थित राहून आमच्या आत्मदहनातील आसुरी आनंद घ्यावा असे आवाहनही त्यांनी प्रशासनाला केले आहे.
जिल्ह्यातून कोल्हापूरला जाण्यासाठी फोंडा, करुळ, भुईबावडा, आंबोली, आंबा आदी घाटमार्ग आहेत. परंतु हे सर्व घाटमार्ग दुर्गम आहेत. या प्रत्येकाची १००१५ किलोमीटर्स लांबी, उंची जास्त आहे. पावसाळ्यात दरडी कोसळून अपघात होतात. या अपघातात आतापर्यंत हजारो प्रवासी अपंग झाले असून शेकडो प्रवासी मरण पावले आहेत.
१९७० च्या दशकात एस. एन. देसाई यांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. घाटमार्गाचे सर्वेक्षण करुन हिरवा कंदील दिल्याने वेंगुर्ले मठ-पणदूर-घोटगे-सोनवडे-कडगाव-पाटगांव-गारगोटी असा महामार्ग मंजूर केला.
घाटमार्ग मंजूर केल्याने आता शासन घाटमार्ग सुरु करील म्हणून आम्ही चार-पाच वर्षे वाट पाहिली. आणि नंतर आमरण उपोषणे, रस्ता रोको, घेराओ, धरणे आदी आंदोलने केली. तेव्हा घाटमार्गाचे काम करण्याच्यादृष्टीने शासनाच्या हालचाली सुरु झाल्या.
ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे घाटमार्गासाठी जमिनी दिल्या. घाटमार्गाच्या दोन्ही बाजूस दोन -दोन किलोमीटर्स पक्के रस्ते करण्यात आले. वन व वनसंज्ञा जमिनीला पर्यायी जमिनी देण्यात आल्या. वन्यप्राणी सर्वेक्षण व जन सुनावणी झाले. कोणतीही तक्रार न करता घाटमार्ग त्वरीत व्हावा म्हणून सहकार्य केले.
डेहराडून पर्यावरणासाठी हिरवा कंदिल दाखविण्यात आलाा. घाटमार्गासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला. एक महिन्याच्या आत सोनवडे घाटमार्गाचे काम सुरु न केल्यास आत्मदहन करण्याची नोटीस दिली. पण शासनाने घाटमार्गाचे काम प्रत्यक्षात सुरु केले नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग व कोल्हापूरमधील कार्यकर्ते व जनता संतप्त झाली आहेत.
इंधन, वेळेची बचत
या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना एस. एन. देसाई यांच्याकडे सोनवडे घाटमार्गाची मागणी केली. या घाटमार्गाची लांबी सहा-सात किलोमीटर आहे. हा घाटमार्ग नसून ही एक टेकडी मार्ग आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. महाराष्ट्राएवढा सोपा व सुरक्षित दुसरा घाटमार्ग नाही. कोल्हापूरचे अंतर सुमारे २० किलोमीटरर्सने कमी होते. इंधन व वेळेची बचत होते.