सिंधुदुर्ग :श्रावणमासामुळे आंबोलीत पर्यटकांची तुरळक गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 11:33 AM2018-08-14T11:33:56+5:302018-08-14T11:37:09+5:30
वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत तुरळक गर्दी होती. श्रावणमास सुरू झाल्याने गर्दी कमी झाल्याचे स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याने वाहतूक यंत्रणा सुरळीत पार पडली.
आंबोली : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत तुरळक गर्दी होती. श्रावणमास सुरू झाल्याने गर्दी कमी झाल्याचे स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याने वाहतूक यंत्रणा सुरळीत पार पडली.
आंबोलीत कोसळणारे धबधबे व तेथील निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी सध्या पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. श्रावण महिन्यापूर्वी रविवारी व शनिवारी आंबोलीत मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली होती.
श्रावण सुरू होताच गर्दी कमी होत असल्याचे चित्र या रविवारी पहायला मिळाले. इतर जिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांनी आंबोलीकडे पाठ फिरविल्याने वाहतूक कोंडीही तितकीशी झाली नव्हती. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.