सिंधुदुर्ग : बांद्यात जीर्ण खांब बदलण्यास प्रारंभ, स्थानिकांमधून समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 04:36 PM2018-05-12T16:36:59+5:302018-05-12T16:36:59+5:30

वीज वितरण कंपनीने बांदा शहरातील जीर्ण झालेले विद्युत खांब बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले होते. गांधीचौक बाजारपेठेतील जीर्ण खांब बदलण्यात आल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Sindhudurg: Start of changing the yellow pillars in the lint, solution from locals | सिंधुदुर्ग : बांद्यात जीर्ण खांब बदलण्यास प्रारंभ, स्थानिकांमधून समाधान

सिंधुदुर्ग : बांद्यात जीर्ण खांब बदलण्यास प्रारंभ, स्थानिकांमधून समाधान

Next
ठळक मुद्दे बांद्यात जीर्ण खांब बदलण्यास प्रारंभ काम युद्धपातळीवर, स्थानिकांमधून समाधान

बांदा : वीज वितरण कंपनीने बांदा शहरातील जीर्ण झालेले विद्युत खांब बदलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले होते. गांधीचौक बाजारपेठेतील जीर्ण खांब बदलण्यात आल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

आठ दिवसांपूर्वी व्यापारी संघाचे सचिव सचिन नाटेकर यांनी बांदा शहरातील बाजारपेठेतील जीर्ण विद्युत खांब तातडीने बदलावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बांदा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपसरपंच अक्रम खान यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता सुभाष आपटेकर यांना घेराओ घालत शहरातील विजेच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली होती.

सरपंच मंदार कल्याणकर यांनीही पावसाळ्यात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी शहरातील जीर्ण विद्युत खांब व वीजवाहक तारा बदलण्याबाबत आपटेकर यांच्याशी चर्चा केली होती. त्यानुसार वीज वितरण कंपनीने युद्धपातळीवर शहरातील कामे पूर्ण करण्यास सुरुवात केली.

मंगळवारी शहरातील गांधीचौक मुख्य बाजारपेठेतील जीर्ण झालेला वीज खांब तातडीने बदलण्यात आला. तसेच शहरात इतर ठिकाणीही विजेचे खांब बदलण्यास सुरुवात केली.

शहरातील जीर्ण झालेल्या वीजवाहक तारा बदलण्यासही सुरुवात करण्यात आल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व विजेच्या समस्या मार्गी लावण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार कामे सुरू असल्याचे सरपंच मंदार कल्याणकर यांनी सांगितले.

बांदा शहरातील गांधीचौक बाजारपेठेतील जीर्ण विद्युत खांब बदलण्यात आला.

Web Title: Sindhudurg: Start of changing the yellow pillars in the lint, solution from locals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.