सिंधुदुर्ग : चौपदरीकरणाचे काम रोखले, आधी मागण्या पूर्ण करा : शिवसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 03:13 PM2018-05-08T15:13:28+5:302018-05-08T15:13:28+5:30

अगोदर जनतेच्या मागण्या पूर्ण करा, नंतरच महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात करा, असे सांगत शिवसेना, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ शहरातील चौपदरीकरणाचे काम रोखले. मागण्या पूर्ण होईपर्यंत काम सुरू करू देणार नाही, असा इशारा यावेळी मुंबई-गोवा महामार्ग अधिकारी आणि दिलीप बिल्डकॉन कंपनीला देण्यात आला.

Sindhudurg: Stop the work of four-laning, complete the demands first: Shiv Sena | सिंधुदुर्ग : चौपदरीकरणाचे काम रोखले, आधी मागण्या पूर्ण करा : शिवसेना

सिंधुदुर्ग : चौपदरीकरणाचे काम रोखले, आधी मागण्या पूर्ण करा : शिवसेना

Next
ठळक मुद्देचौपदरीकरणाचे काम रोखले, आधी मागण्या पूर्ण करा : शिवसेना मनसेचे पदाधिकारी आक्रमक

कुडाळ : अगोदर जनतेच्या मागण्या पूर्ण करा, नंतरच महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात करा, असे सांगत शिवसेना, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ शहरातील चौपदरीकरणाचे काम रोखले. मागण्या पूर्ण होईपर्यंत काम सुरू करू देणार नाही, असा इशारा यावेळी मुंबई-गोवा महामार्ग अधिकारी आणि दिलीप बिल्डकॉन कंपनीला देण्यात आला.

कुडाळ तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. कुडाळ शहरातील कामासही सुरूवात झाली असून सोमवारी सकाळी काळपनाका येथे झाडे तोडण्याचे काम सुरू होते. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब आणि अभय शिरसाट यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी हे काम रोखले. मागण्या पूर्ण होईपर्यंत काम सुरू करू देणार नाही, असा इशारा देण्यात आला.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर महामार्गचे अधिकारी आणि दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी येत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी शहरातून जाणारा महामार्ग कसा आहे, त्यासाठी किती जमीन संपादित केली आहे, थ्रीडी नकाशा कसा आहे, बॉक्सवेल की उड्डाण पूल असणार, भूधारकांना दुप्पट की चौपट रक्कम मिळणार आदी प्रश्नांचा भडिमार केला.

तसेच याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसमवेत सर्वपक्षीय अधिकारी, महामार्ग अधिकारी, ठेकेदार कंपनी यांची बैठक होत नाही, तोपर्यंत येथील महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू न करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला होता. मात्र, यासंदर्भात कोणताच निर्णय झाला नसताना येथील काम कसे काय सुरू केले, असा प्रश्न शिरसाट आणि परब यांनी उपस्थित केला.

यावेळी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी महामार्गाच्या शासनाच्या जमिनीत आम्ही काम करीत असून, तुम्ही तुमच्या मागण्यांचे लेखी पत्र द्या, असे शिरसाट व परब यांना सांगितले.

Web Title: Sindhudurg: Stop the work of four-laning, complete the demands first: Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.