सिंधुदुर्ग : विद्यार्थ्याला मालवण येथील १०० इडियट ग्रुपची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 03:39 PM2018-05-08T15:39:22+5:302018-05-08T15:39:22+5:30
मालवण येथील १०० इडियट ग्रुपने ओसरगांव येथील अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला वीस हजार रूपयांची आर्थिक मदत करत कुटुंबाला हातभार लावून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. शुभम जनार्दन चव्हाण असे या मदत केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
सिंधुदुर्गनगरी : मालवण येथील १०० इडियट ग्रुपने ओसरगांव येथील अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला वीस हजार रूपयांची आर्थिक मदत करत कुटुंबाला हातभार लावून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. शुभम जनार्दन चव्हाण असे या मदत केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
मालवण येथील मित्र परिवार एकत्र येत १०० इडियट या नावाचा व्हॉट्सअप ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. पंचक्रोशीत नव्हे तर जिल्ह्यात कोठेही गरीब कुटुंबावर एखादे संकट ओढवले तर या ग्रुपच्या माध्यमातून ह्यत्याह्ण कुटुंबियांना आर्थिक स्वरूपाची मदत करून दातृत्वाची भूमिका पार पाडली जाते.
कणकवली तालुक्यातील आठवी इयत्तेत शिकणाऱ्या शुभमचा फेब्रुवारी महिन्यात अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीररित्या जखमी होऊन त्याच्या हनुवटीला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. घरची परिस्थिती गरिबीची होती.
याच भावनेतून १०० इडियट ग्रुपचे सदस्य या कुटुंबाच्या मदतीला धावून गेले व या कुटुंबाला २० हजार रुपयांची आर्थिक मदत केली. यावेळी ग्रुपचे सदस्य सिझर डिसोझा, प्रसाद परूळेकर, मयूर पाटकर, राजा शंकरदास, युवराज चव्हाण, राजा कोरगांवकर उपस्थित होते. यापूर्वीही या ग्रुपने कित्येक गरजूंना मदत केली आहे.