सिंधुदुर्ग : दांडी किनाऱ्यावर संशयास्पद पाकीट, सुरक्षा यंत्रणा हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 02:38 PM2018-08-24T14:38:21+5:302018-08-24T14:39:50+5:30
दांडी किनारपट्टीवर मेस्त रापण संघाच्या जाळ्यात संशयास्पद काळ्या रंगाचे पाकीट आढळून आले. या पाकिटावर उर्दू भाषेत मजकूर, ८८८ असे अंक व गरुड पक्षाचे चिन्ह असल्याचे दिसून आल्याने मच्छिमार व मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दांडी किनारी जात संशयास्पद पाकीट ताब्यात घेतले.
मालवण : दांडी किनारपट्टीवर मेस्त रापण संघाच्या जाळ्यात संशयास्पद काळ्या रंगाचे पाकीट आढळून आले. या पाकिटावर उर्दू भाषेत मजकूर, ८८८ असे अंक व गरुड पक्षाचे चिन्ह असल्याचे दिसून आल्याने मच्छिमार व मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दांडी किनारी जात संशयास्पद पाकीट ताब्यात घेतले.
सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मच्छिमार बांधव सुरक्षा यंत्रणांचे कान, नाक व डोळे असतात. त्यामुळे समुद्रात संशयास्पद वस्तू किंवा हालचाल दिसून आल्यास मच्छिमार बांधव तत्काळ सुरक्षा यंत्रणाना माहिती देतात.
दांडी किनारी मासेमारीस गेलेल्या मेस्त रापण संघाचे मच्छिमार मंगळवारी सायंकाळी रापणीची जाळी ओढत असताना मासळीबरोबरच काळ्या रंगाचे चिकट द्रव्य पदार्थ असलेले पाकीट आढळून आले.
पाकिटातून उग्र वास
- मच्छिमारांना पाकिटातून उग्र वास येऊ लागला. त्यानंतर बुधवारी सकाळी त्यांनी मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर यांना ही माहिती दिली.
- पराडकर यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानुसार पोलीस हवालदार निलेश सोनावणे व संतोष गलोले यांनी ते पाकीट ताब्यात घेतले.