सिंधुदुर्ग : तेंडोलीत आंबा, काजू कलम बागेला आग, ३0 एकर क्षेत्र खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 07:02 PM2018-05-17T19:02:11+5:302018-05-17T19:02:11+5:30
कुडाळ तालुक्यातील तालुक्यातील तेंडोली येथील सुमारे ३० एकर जमीन क्षेत्रातील काजू, आंबा कलम बागेला आग लागून अठराशे काजू आणि आंबा कलमांसह बाराशे मीटरची पाईप लाईन खाक झाली. यात पाच ते सहा बागायतदारांचे सुमारे २५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
कुडाळ : तालुक्यातील तालुक्यातील तेंडोली येथील सुमारे ३० एकर जमीन क्षेत्रातील काजू, आंबा कलम बागेला आग लागून अठराशे काजू आणि आंबा कलमांसह बाराशे मीटरची पाईप लाईन खाक झाली. यात पाच ते सहा बागायतदारांचे सुमारे २५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
सध्या वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे जिल्ह्यातील सुकलेल्या गवताला आग लागून आंबा-काजू बागायती भस्मसात होण्याचे प्रकार वाढले आहेत. यात बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
तेंडोली-कुंभारवाडी येथील सुमारे ३० एकर जमीन क्षेत्रातील बागायतीला बुधवारी दुपारी आग लागली. येथील बागायतदार सायमंड डिसोजा, प्रकाश राऊळ, किशोर मुणनकर, यशवंत तेंडोलकर, यशवंत परब तसेच यांची सुमारे ८०० आंबा कलमे, १००० काजू कलमे तसेच १२०० मीटर पाईप लाईन खाक झाली.
आग लागल्याचे तेथील ग्रामस्थ व जवळच्या बागेत काम करणाऱ्या कामगारांच्या लक्षात येताच या सर्वांनी तत्काळ घटनास्थळी जात आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र रणरणते ऊन आणि वाऱ्यामुळे आग पसरत जाऊन काही वेळातच सुमारे ३० एकर परिसरात पसरली.
तेंडोलीच्या तलाठ्यांनी नुकसानीचा पंचनामा केला. लोकप्रतिनिधींनी भेट देत पाहणी केली. दरम्यान, आंबा आणि काजू कलमांवरील फळे काढणीयोग्य झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होणार होता. मात्र सर्व कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने बागायतदारांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.