पॉवरलिफ्टिंगमध्ये सिंधुदुर्ग संघाचे यश

By admin | Published: March 12, 2015 09:25 PM2015-03-12T21:25:23+5:302015-03-12T23:54:24+5:30

झारखंडमध्ये स्पर्धा : पाच सुवर्ण, एक रौप्य, एक कांस्यपदकाची कमाई

Sindhudurg team success in powerlifting | पॉवरलिफ्टिंगमध्ये सिंधुदुर्ग संघाचे यश

पॉवरलिफ्टिंगमध्ये सिंधुदुर्ग संघाचे यश

Next

वेंगुर्ले : झारखंड पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आयोजित राष्ट्रीय युवक क्रीडा विभाग भारत सरकार व इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशन मान्यतेच्या राष्ट्रीय बेंचप्रेस पुरुष, महिला पॉवरलिफ्टिंग इक्वीए, अनइक्वीए चॅम्पियनशिप आणि एशियन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप २०१५ हाँगकाँग निवड चाचणी स्पर्धेत पॉवरलिफ्टिंग संघाने पाच सुवर्ण, तसेच एक रौप्य व कांस्यपदक जिंकले. जे. आर. डी. टाटा स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, जमशेदपूर येथे मंगळवारी झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे राज्य अध्यक्ष गुरुवर्य मधुकर दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झालेल्या सिंधुदुर्गच्या ६० जणांच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी केली. यामध्ये सब ज्युनियर गटातील ८४ किलो वजनी गटात डायना जॉन डिसोजा हिने इक्वीए व अनइक्वीएमध्ये दोन सुवर्ण पदके प्राप्त करीत सुवर्णकन्या होण्याचा ुमान मिळविला, तर ७२ किलो वजनी गटात नमिता गावडे हिने रौप्यपदकाची मानकरी ठरली. राष्ट्रीय खेळाडू अनुजा तेंडोलकर हिने महिला मास्टर गटात ८४ किलोवरील वजनी गटात दबदबा कायम राखत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. वेंगुर्ले-खानोली येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू दिलीप नार्वेकर यांनी ९३ किलो वजनीगटात मास्टर दोन गटातून एक सुवर्ण व एक कांस्यपदक मिळवून सिंधुदुर्ग संघाला राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविले. देशभरातून २७ राज्यांतील सहाशे स्पर्धक या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते. यशस्वी स्पर्धकांचे सिंधुदुर्ग पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष पुष्कराज कोले, इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनचे सुब्रतो दत्ता, मधुकर दरेकर, सिंधुदुर्ग विद्यानिकेतन अध्यक्षा अ‍ॅड. निर्मला सामंत प्रभावळकर, नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, नगरसेवक मनीष परब, रमण वायंगणकर, रोटरी सचिव राजन गिरप, सिंधुदुर्ग विद्यानिकेतनचे आनंद परूळेकर, प्रशांत नेरूरकर, प्राचार्य स्वरा तळेकर, बॅ. खर्डेकर कॉलेजचे
प्रा. डॉ. विलास देऊलकर, राजेश घाटवळ, प्रशिक्षक अमोल तांडेल, किशोर सोन्सूरकर यांनी अभिनंदन केले. (वार्ताहर)

महिला गटाला ‘जनरल चॅम्पियन’
सिंधुदुर्ग संघाने उत्कृष्ट कामगिरी केल्याने महाराष्ट्राला महिला गटासाठी ‘जनरल चॅम्पियन’ हे प्रथम क्रमांकाचे पदक प्राप्त झाले. मुंबईच्या पोलीस उपनिरीक्षक कल्पना सावंत यांनी बेंचप्रेसमध्ये तीन सुवर्ण व एक रौप्यपदक प्राप्त करत ‘स्ट्राँग वुमन’ हा किताब मिळविला. या स्पर्धेतून हाँगकाँग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी राष्ट्रीय संघ निवडला जाणार आहे.

Web Title: Sindhudurg team success in powerlifting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.