सिंधुदुर्ग : दहशतवाद ही देशाला लागलेली कीड, शिवप्रसाद पवार : दहशतवाद विरोधी जनजागृती सप्ताहात मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 07:56 PM2018-01-19T19:56:40+5:302018-01-19T20:06:15+5:30
दहशतवाद ही देशाला लागलेली कीड आहे. दहशतवादाला जात, धर्म, पंथ, वय नसून ती एक विचारधारा आहे. दहशतवाद संपविण्यासाठी प्रत्येकाने विचारधारेत परिवर्तन केल्यास दहशतवादी तयार होणार नाहीत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद पवार यांनी येथे केले.
सिंधुदुर्ग : दहशतवाद ही देशाला लागलेली कीड आहे. दहशतवादाला जात, धर्म, पंथ, वय नसून ती एक विचारधारा आहे. दहशतवाद संपविण्यासाठी प्रत्येकाने विचारधारेत परिवर्तन केल्यास दहशतवादी तयार होणार नाहीत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद पवार यांनी येथे केले.
सोशल मीडियाचा वापर करून दहशतवादी संघटना युवकांना दहशतवादी बनवू पहात असल्याचेही त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा दहशतवाद विरोधी पथकाच्यावतीने दहशतवाद विरोधी जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश भोसले, दोडामार्गचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र्र गुरव, दहशतवाद विरोधी पथकाचे योगेश सातोसे, गौरेश राणे, मंगेश साटम, महाविद्यालयाचे प्राचार्य एस. डी. डिसले, डॉ. एस. डी. आवटे, प्राध्यापक प्रमोद जमदाडे, व्ही. जी. भास्कर आदी उपस्थित होते.
संशयित हालचालींची माहिती पोलिसांना द्या
पवार म्हणाले, दहशतवादी संघटना सोशल मीडियाचा वापर करून १५ ते २५ वयोगटातील युवकांना दहशतवादी संघटनेकडे आकर्षित करू पाहत आहेत. अशाप्रकारच्या सोशल मीडियाच्या धोकादायक मेसेजची तसेच कोणतीही संशयित हालचाल दिसल्यास त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला द्या व सतर्क रहा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गुरव यांनी दहशतवाद विरोधी जनजागृती तसेच करिअर गाईडन्सबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.