सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील जानवली येथील भवानी मंदिरात चोरी, ४० हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 02:41 PM2018-01-18T14:41:53+5:302018-01-18T14:48:34+5:30

कणकवली तालुक्यातील जानवली दळवीवाडी येथील श्री भवानी मंदिरात बुधवारी रात्री चोरीची घटना घडली आहे. मंदिराच्या दरवाजाचा कड़ी कोयंडा तोडून आत प्रवेश करून देवीचे दागिने तसेच दानपेटीतील रक्कम असा सुमारे ४० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.

Sindhudurg: Theft in the Bhavani temple at Janawali in Kankavli taluka | सिंधुदुर्ग : कणकवली तालुक्यातील जानवली येथील भवानी मंदिरात चोरी, ४० हजारांचा ऐवज लंपास

जानवली येथील श्री भवानी मंदिरात अज्ञात चोरट्याने चोरी केली.

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवली तालुक्यातील जानवली येथील भवानी मंदिरात चोरीदेवीचे दागिने तसेच दानपेटीतील रक्कम असा ४० हजारांचा ऐवज लंपास

कणकवली : तालुक्यातील जानवली दळवीवाडी येथील श्री भवानी मंदिरात बुधवारी रात्री चोरीची घटना घडली आहे. मंदिराच्या दरवाजाचा कड़ी कोयंडा तोडून आत प्रवेश करून देवीचे दागिने तसेच दानपेटीतील रक्कम असा सुमारे ४० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे.



बुधवारी रात्री 2 वाजल्यानंतर ही चोरी झाली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी ही चोरी उघडकीस आली. पाणी सोडण्यासाठी जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या नळ योजना कर्मचाऱ्याच्या निदर्शनास मंदिराच्या जवळील रस्त्यावर फोडलेल्या स्थितीत दानपेटी आढळून आली.



त्यामुळे त्या कर्मचाऱ्याला मंदिरात चोरी झाल्याचा संशय आल्याने त्याने तेथील ग्रामस्थाना या घटनेबाबत तत्काळ माहिती दिली. त्यांनी मंदिरात जावून पाहिले असता अर्धा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, ७ चाँदिचे पतवे ही गायब असल्याचे लक्षात आले.


 दानपेटीही जाग्यावर नव्हती . रस्त्यावर फोडलेल्या अवस्थेत दान पेटी आढळून आली. दसऱ्याच्या उत्सवानंतर ही दानपेटी उघडण्यात आली नव्हती. त्यामुळे त्यामध्ये सुमारे ७ हजार रूपये तरी असावेत असा अंदाज ग्रामस्थानी व्यक्त केला आहे. या घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून ते अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Sindhudurg: Theft in the Bhavani temple at Janawali in Kankavli taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.