सिंधुदुर्ग : वाहतूक शाखेच्यावतीने गतवर्षभरात २६५२७ केसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:22 PM2019-01-03T12:22:33+5:302019-01-03T12:23:27+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा वाहतुक शाखेच्यावतीने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर २६ हजार ५२७ केसेस करण्यात आल्या आहेत. त्यातून ५५ कोटी ८८ लाख ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा वाहतुक शाखेच्यावतीने १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर २६ हजार ५२७ केसेस करण्यात आल्या आहेत. त्यातून ५५ कोटी ८८ लाख ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
मोबाईल संभाषण आणि मद्यपान करून वाहन चालविल्याप्रकरणी ५९ वाहन चालकांचे वाहन परवाना निलंबित करण्याकरिता प्रस्ताव सिंधुदुर्ग उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण व सावंतवाडी आदि ठिकाणी हेल्मेटचा वापर न करणे, वाहन परवाना नसणे, सिटबेल्ट न लावणे आदी विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
या कालावधीत वेगवेगळ्या मोटार वाहन कायद्यानुसार २६ हजार ५२७ केसेस दाखल करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील वाहतूक चालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि वाहन चालविताना काळजी घ्यावी असे आवाहनही जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांनी केले आहे.
५९ वाहन चालकांचा वाहन परवाना निलंबितसाठी प्रस्ताव
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई केली जात असतानाच वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करणे आणि मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ५९ वाहन चालकांच्या वाहन परवाना निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव सिंधुदुर्ग उपप्रादेशीक परिवहन विभागाकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांनी दिली.