मालवण तळाशील खाडी किनारी होडी बुडाली, एकाचा बुडून मृत्यू, एक बेपत्ता

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 9, 2024 01:18 PM2024-06-09T13:18:20+5:302024-06-09T13:20:52+5:30

एक जण पोहत किनाऱ्यावर पोहचला, स्थानिक तसेच पोलिस प्रशासनाकडून शोध सुरू

Sindhudurg tragedy boat capsized off Malvan Bay one dead one missing | मालवण तळाशील खाडी किनारी होडी बुडाली, एकाचा बुडून मृत्यू, एक बेपत्ता

मालवण तळाशील खाडी किनारी होडी बुडाली, एकाचा बुडून मृत्यू, एक बेपत्ता

संदीप बोडवे, लोकमत न्यूज नेटवर्क, मालवण: तळाशील खाडी किनारी पात (छोटी होडी) बुडाली असून होडीतील एक जण पोहत तळाशील किनाऱ्यावर पोचला. मात्र अन्य दोघेजण पाण्यात बेपत्ता झाले होते. यापैकी एकाचा मृतदेह रविवारी सकाळी सापडून आला. शनिवार ८ जून रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अचानक वाढलेल्या वाऱ्या पावसात होडी नदीपात्रात (खाडी) उलटल्याने ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान बेपत्ता एका मच्छिमारांचा शोध सूरू आहे.

मालवण पोलिसांनी दिलेल्या महिनानुसार किशोर महादेव चोडणेकर (वय ५५), मुलगा लावण्य किशोर चोडणेकर  (वय १४), दोन्ही रा. तळाशील मालवण तसेच धोंडीराज परब (वय ५५) मूळ रा. तारकर्ली हे तिघे ८ जून रोजी सायंकाळी उशिरा तळाशील खाडीमध्ये पात (छोटी होडी) घेऊन मच्छीमारीसाठी गेले होते. सर्जेकोट तळाशील समोर समुद्रात होडी असताना असताना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अचानक वाढलेल्या पाऊस आणि वाऱ्यामुळे होडी नदीत (खाडीत) उलटल्याने तिघेही जण पाण्यामध्ये पडले.

लावण्य चोडणेकर याने गाठला किनारा

होडीतून पाण्यात पडलेल्या तिघांपैकी लावण्य किशोर चोडणेकर या मुलाने पोहत पोहत तळाशील किनारा गाठला. आपल्या सोबत असलेले वडील किशोर चोडणेकर व धोंडीराज परब हे दोघेही पाण्यामध्ये बेपत्ता झाल्याचे त्यांनी स्थानिक ग्रामस्थांना सांगितले.

स्थानिक तसेच पोलिस प्रशासनाकडून शोध सुरू

पाण्यात बुडालेल्या दोन्ही मच्छिमारांचा शोध सूरू होता  रात्रीचा अंधार तसेच पाऊस असल्याकारणाने शोध कार्यात अडथळे येत होते.


एका मच्छीमारांचा मृतदेह सापडला

रविवारी सकाळी बुडून बेपत्ता झालेल्या मच्छीमारांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली यावेळी शोध पथकास होडी बुडालेल्या ठिकाणी जाळ्याच्या दोरात अडकलेल्या अवस्थेत तारकर्ली येथील धोंडीराज परब यांचा मृतदेह आढळून आला.  

एका बेपत्ताचे शोधकार्य सुरू...
दरम्यान किशोर चोडणेकर यांचा अद्यापही शोध लागला नव्हता. शोध पथकाच्या  सहभागतून सकाळ पासून  शोध मोहीम सूरू होती. या शोध  पथकात  सुजित मोंडकर, वैभव खोबरेकर, समीर गोवेकर, प्रसाद मयेकर, जगदीश तोडणकर, भूपेंद्र तोडणकर, वसंत गावकर, व अन्य 
तळाशिल ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. धोंडीराज परब यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती मालवण पोलिस निरीक्षक  प्रवीण कोल्हे यांनी दिली.

Web Title: Sindhudurg tragedy boat capsized off Malvan Bay one dead one missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.