सिंधुदुर्ग :  कोकण परिक्षेत्रातील अठरा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 04:40 PM2018-06-02T16:40:53+5:302018-06-02T16:40:53+5:30

महाराष्ट्र पोलीस दलातील कोकण परिक्षेत्रातील १८ निशस्त्र पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय तर एक पोलीस निरीक्षकाची विनंतीवरून कोकण परिक्षेत्रीय अधिकारी नवल बजाज यांनी बदली केली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.

Sindhudurg: Transfers of eighteen police inspectors in the Konkan range | सिंधुदुर्ग :  कोकण परिक्षेत्रातील अठरा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

सिंधुदुर्ग :  कोकण परिक्षेत्रातील अठरा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Next
ठळक मुद्दे कोकण परिक्षेत्रातील अठरा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यासिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ पोलीस निरीक्षकांचा समावेश

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र पोलीस दलातील कोकण परिक्षेत्रातील १८ निशस्त्र पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय तर एक पोलीस निरीक्षकाची विनंतीवरून कोकण परिक्षेत्रीय अधिकारी नवल बजाज यांनी बदली केली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.

कोकण परिक्षेत्रीय महानिरीक्षकांनी केलेल्या प्रशासकीय बदलीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विश्वजित बुलबुले यांची पालघर येथे, अरविंद बोडके यांची रत्नागिरी, हेमंतकुमार शहा यांची पालघर, जयकुमार सूर्यवंशी यांची पालघर, रत्नागिरी जिल्ह्यातील डॅनियल बेन यांची पालघर, विनीत चौधरी यांची ठाणे ग्रामीण, हनुमंत डंगारे यांची रायगड येथे बदली करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील आप्पासाहेब लेंगरे यांची पालघर, मनोजकुमार म्हात्रे यांची ठाणे ग्रामीण, जितेंद्र वनकोटी यांची पालघर, ठाणे ग्रामीणमधील भास्कर पुकळे यांची पालघर, अनिल टोम्पे यांची रायगड, सुरेश खेडेकर यांची रायगड, राजेंद्र्र कांबळे यांची पालघर, पालघर जिल्ह्यातील कलगोंडा हेगाजे यांची रायगड, विजय शिंदे यांची ठाणे ग्रामीण, केशवराज नाईक यांची ठाणे ग्रामीण, संजय हजारे यांची ठाणे ग्रामीण येथे प्रशासकीय तर रायगड जिल्ह्यातील दत्तात्रय बोराटे यांची ठाणे ग्रामीण येथे विनंतीनुसार बदली करण्यात आली आहे.

Web Title: Sindhudurg: Transfers of eighteen police inspectors in the Konkan range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.