सिंधुदुर्ग : ट्रक दरीत कोसळला, आंबोलीतील घटना : कारचेही नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 06:04 PM2018-05-30T18:04:25+5:302018-05-30T18:04:25+5:30
आंबोली मुख्य धबधब्याजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना नियंत्रण सुटल्याने ट्रक सुमारे वीस फूट खोल दरीत कोसळल्याची घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. ट्रकच्या मागील बाजूसमोरून येणाऱ्या कारला धडक बसल्याने यात कारचेही नुकसान झाले. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
आंबोली : आंबोली मुख्य धबधब्याजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना नियंत्रण सुटल्याने ट्रक सुमारे वीस फूट खोल दरीत कोसळल्याची घटना सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. ट्रकच्या मागील बाजूसमोरून येणाऱ्या कारला धडक बसल्याने यात कारचेही नुकसान झाले. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
आंबोली मुख्य धबधब्याजवळ धोकादायक वळणावर सावंतवाडीहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारा ट्रक समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वीस फूट खोल दरीत कोसळला. समोरून येणाऱ्या कारला ट्रकच्या मागील बाजूची धडक बसली. यात कारचे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले. ट्रकमधील पिग आयर्न दरीत फेकले गेले.
अपघाताबाबत माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिकांसोबत घटनास्थळी धाव घेतली व ट्रक चालकाची शोधाशोध सुरू केली. पण तो सापडू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी या अपघाताबाबत चौकशी केली असता ट्रकचालक आपल्या गावी पोहोचल्याचे समजले. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास सावंत व पोलीस हवालदार प्रकाश कदम करीत आहेत.