सिंधुदुर्ग : नाधवडे-नवलादेवीवाडीतील पंचवीस हेक्टर शेती ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 06:49 PM2018-11-01T18:49:23+5:302018-11-01T18:53:42+5:30

वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावची नवलादेवीवाडी, परंपरागत भात शेती करण हे वाडीतल्या शेतकऱ्यांची पिढ्यान-पिढ्याची शेती करण्याची पद्धत, १९९२ च्या पावसाळ्यात या वाडीच्या परिसरात मोठा पाऊस झाला. वाडीच्या शेजारच्या डोंगराचे भूसख:लन झाले आणि डोंगरावरील सर्व माती या वाडीच्या परिसरात पसरली.

Sindhudurg: Twenty-five hectares of agricultural land, Nathavade-Navaldeviwadi | सिंधुदुर्ग : नाधवडे-नवलादेवीवाडीतील पंचवीस हेक्टर शेती ओलिताखाली

नाधवडे नवलाईवाडी परिसरातील २५ वर्षे पडिक शेती पुन्हा ओलिताखाली आली.

googlenewsNext
ठळक मुद्देपंचवीस हेक्टर शेती ओलिताखाली, नाधवडे-नवलादेवीवाडी जलयुक्त शिवारअंतर्गत ओहोळाचे रूंदीकरण, कृषी अधिकाऱ्यांच्या समितीकडून पाहणी

सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावची नवलादेवीवाडी, परंपरागत भात शेती करण हे वाडीतल्या शेतकऱ्यांची पिढ्यान-पिढ्याची शेती करण्याची पद्धत, १९९२ च्या पावसाळ्यात या वाडीच्या परिसरात मोठा पाऊस झाला. वाडीच्या शेजारच्या डोंगराचे भूसख:लन झाले आणि डोंगरावरील सर्व माती या वाडीच्या परिसरात पसरली.

भातशेती करण बंद झाले. त्याच बरोबर या वाडीच्या परिसरातील तसेच डोंगरवरील पडणारे पावसाचे पाणी ज्या ओहोळाने (ओढ्याने) नैसर्गिकरित्या जायचे तो ओहोळही पूर्णपणे मातीने भरुन गेला. नैसर्गिकरित्या जाणार पावसाचं पाणी थांबल्यामुळे १९९२ पासून या परिसरात पावसाचं पाणी तुंबून रहायला लागलं.

त्यामुळे भात शेती काय पण इतर शेती करणंही या वाडीतल्या शेतकऱ्यांना जमत नव्हते. त्यामुळे १९९२ पासून येथे शेती करण दुरापास्त झाले होते. सुमारे २५ वर्ष पाणी साठण्याच्या समस्येमुळे या वाडीतील शेतकऱ्यांना शेती करता येत नव्हती.

सन २0१६-१७ आराखड्यात यासाठी निधी मंजूर झाला. जे. सी. बी. च्या सहाय्याने काम सुरू झाले. या ओहाळातील एक किलोमीटर लांबीचे रुंदीकरण व माती काढण्याचे काम करण्यात आले. सुमारे सहा लक्ष रुपये खर्च करण्यात आला. २0१७ च्या पावसाळ्यात डोंगरावरील व परिसरात पडलेल्या पावसाच पाणी या ओहळातून जाऊ लागले. परिसरातील २५ हेक्टर क्षेत्रावर आता नव्या उमेदीन वाडीतील शेतकरी भात पिक घेऊ लागले आहेत.

अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, पत्रकार चंद्रशेखर देसाई, महेश सरनाईक, तुषार सावंत, अजित सावंत, भगवान लोके, चंद्रशेखर तांबट या पत्रकारांसह या वाडीतल्या परिसराचा पाहणी दौरा केला. वाडीतल्या शेजारच्या ओहोळातील रुंदीकरण व मातीच्या काढण्यामुळे वाडीच्या परिसरातील २५ हेक्टर क्षेत्रावर पुन्हा भाताची भरलेल्या लोंब्यांची शेती फुलली आहे. या सर्वांच्या पाहणी बरोबरच वाडीतल्या शेतकºयांशी समक्ष संवाद साधला.

पत्रकार दौऱ्याच्या पाहणी वेळी काही महिला व पुरुष शेतात भाताची झोडणी करताना दिसत होते. भाताची झोडणी करताना त्यांचे श्रमाने थकलेले पण झोडणीच्या वेळी शिवारातील खळ्यात पडलेल्या भाताच्या दाण्याकडे पाहून त्यांच्या श्रमाचश द्वीगुणीत आनंदात परिवर्तन झालेल आम्हा सर्वांना दिसून आले. नवलाईवाडी परिसरातील २५ वर्षे पडिक शेती पुन्हा ओलिताखाली आली याचे सर्व शेतकऱ्यांना समाधान वाटत होत.


विहिरींना मे महिन्यातही पाणी

वाडीतील शेतकरी मनोहर गवस, संजय नकाशे, प्रवीण पेडणेकर, शंकर खांडेकर, सहदेव खांडेकर, आनंद कुडाळकर या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाला उधान आलं होतं. केवळ खरीपातील भात शेतीच नव्हे तर यंदाच्या उन्हाळ्यात त्यांनी रब्बी हंगामातील मूग, चवळी, कुळीथ, भूईमूग अशी पिक घेण्याचा निश्चय बोलून दाखविला.

शिवारात पावसाचं पाणी तुंबून राहण्याची समस्या दूर होण्या बरोबरच ओहोळाच्या रुंदीकरण व माती काढण्यामुळे या परिसरात पाणी पाझरामुळे आता उन्हाळी शेतीला आम्हा सर्र्वाना शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास या सर्व शेतकऱ्यांनी व्यक्त केला. या वाडीतल्या शिवाराच्या आसपास चार विहिरी आहेत. या चारही विहिरींना यंदाच्या मे महिन्यातही मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

१00 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येईल

या पाण्याच्या उपलब्धतेमुळे या परिसरात फळझाड लावडीसही चालना मिळेल, याच बरोबर १00 हेक्टर क्षेत्र भात लागवडी खाली येईल, असा विश्वास तालुका कृषि अधिकारी भगवान यांनी यावेळी व्यक्त केला.

९ लाखांचे अंदाजपत्रक

१९९२ ला डंगरावरील झालेल्या भूसख:लनाची माती काढणे खूप कष्टप्रद तसेच खर्चिक काम होते. या नाधवडे गावचे कृषी सहाय्यक व्ही. ए. नाईक यांनी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी यांच्यासमोर जलयुक्त शिवारची माहिती दिली. यावेळी नेमक काय करायचे याची चर्चा झाली. नैसर्गिकरित्या पावसाचे पडणारे पाणी जाण्यासाठी वाडीच्या शेताच्या ओहाळातील माती काढणे व रुंदीकरण करण्याचे काम निश्चित करण्यात आले. सुमारे ९ लक्ष रुपयांचे खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले.

 

Web Title: Sindhudurg: Twenty-five hectares of agricultural land, Nathavade-Navaldeviwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.