सिंधुदुर्ग : दोन होड्या जाळल्या, दोन बुडविल्या एक कामगार ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 01:17 PM2019-01-04T13:17:18+5:302019-01-04T13:21:50+5:30
कर्ली खाडी पात्रालगत कोरजाई-गाडेधाववाडी येथील अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या दोन होड्या जाळल्या, दोन होड्या बुडवल्या तर वाळू रॅम्प तोडून एका परप्रांतीय कामगाराला ताब्यात घेण्यात आले आहे. वेंगुर्ले महसूल व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त धडक कारवाई केल्याची माहिती तहसीलदार शरद गोसावी यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग : कर्ली खाडी पात्रालगत कोरजाई-गाडेधाववाडी येथील अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या दोन होड्या जाळल्या, दोन होड्या बुडवल्या तर वाळू रॅम्प तोडून एका परप्रांतीय कामगाराला ताब्यात घेण्यात आले आहे. वेंगुर्ले महसूल व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त धडक कारवाई केल्याची माहिती तहसीलदार शरद गोसावी यांनी दिली आहे.
अनधिकृत वाळू उत्खनन बाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या नंतर विविध गेले दोन दिवस वेंगुर्ला महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन या अनधिकृत वाळू उत्खनन वर कारवाई करत आहेत. सकाळी वेंगुर्ले महसूल व पोलीस प्रशासनाने कर्ली खाडी पात्रालगत कोरजाई-गाडेधाव वाडी येथे धडक कारवाई केली.
यात तहसीलदार शरद गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली मंडळ अधिकारी चव्हाण, तलाठी गायकवाड, पोलीस केरकर, अनिकेत सावंत, पोलीस पाटील चव्हाण, घोलेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वाळू माफियांचे धाबे दणाणले
या कारवाईत अनधिकृत वाळू उत्खननास वापर होत असलेल्या ४ होड्या पाण्यात बुडविण्यात आल्या तर दोन होड्या जाळण्यात आल्या तसेच अनधिकृत रित्या उभारण्यात आलेले वाळू रॅम्पही उध्वस्त करण्यात आले.
यावेळी एका परप्रांतीय कामगाराला ताब्यात घेण्यात आले असून एका कामगाराने पलायन केले. अशाच प्रकारचे अनधिकृत वाळू उत्खनन वेंगुर्ला शहरानजिक एका ठिकाणी रात्रीच्या वेळेस जोरदार सुरू आहे. याचा शोध घेऊन यावरही महसूल विभाग व पोलीस प्रशासन धडक कारवाई करणार काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून या करवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.