सिंधुदुर्ग : कुडाळ महामार्गावर दुचाकींची धडक; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 04:22 PM2018-04-13T16:22:57+5:302018-04-13T16:22:57+5:30
कुडाळ येथील मुंबई-गोवा महामार्गावर दोन दुचाकीत समोरासमोर जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात वेताळबांबर्डे येथील दुचाकीस्वार मिलिंद कृष्णा साळसकर (४५) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा दुचाकीस्वार हाही जखमी झाला असून त्याच्यावर कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा भीषण अपघात गुरुवारी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडला.
कुडाळ : कुडाळ येथील मुंबई-गोवा महामार्गावर दोन दुचाकीत समोरासमोर जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात वेताळबांबर्डे येथील दुचाकीस्वार मिलिंद कृष्णा साळसकर (४५) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा दुचाकीस्वार हाही जखमी झाला असून त्याच्यावर कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा भीषण अपघात गुरुवारी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडला.
कुडाळ केळबाईवाडी येथील दिनार खानविलकर (२०) हा दुचाकीने कुडाळ महामार्गावरून पिंगुळीच्या दिशेने जात होता. याच दरम्यान दिनार रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील महामार्गावर आला असता समोरून दुचाकी घेऊन येणाऱ्या साळसकर यांच्या व दिनारच्या दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.
अपघातातील दुचाकींची झालेली ही धडक इतकी जोराची होती की दोन्ही दुचाकींच्या दर्शनी भागाचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दोन्ही दुचाकींची समोरील चाके तुटली होती. या अपघातातील मृत मिलिंद साळसकर यांच्या ताब्यात नवीन नंबरप्लेट मिळालेली दुचाकी होती.
मिलिंद साळसकर
या भीषण अपघातात साळसकर यांना गंभीर दुखापत झाली. तसेच ते जोराने खाली पडल्याने त्यांच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
अपघात होताच तेथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत साळसकर व दिनार या दोघांनाही तत्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र साळसकर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी जाहीर केले. तर जखमी दिनार याच्यावर कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताचे वृत्त समजताच कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पडेलकर व त्यांच्या सहकारी कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
कुडाळ पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून याची माहिती दिनेश खानविलकर यांनी दिली आहे. मिलिंद साळसकर यांना अपघात झाल्याचे वृत्त समजताच वेताळबांबर्डे गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती.
साळसकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील मृत झालेले मिलिंद साळसकर हे गवंडी काम करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवित होते. त्यांच्या निधनामुळे साळसकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई व भाऊ असा परिवार आहे.