Sindhudurg: सह्याद्रीच्या पट्ट्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, सांगेली येथे घरावर झाडे कोसळली, सावंतवाडीत पावसाचा शिडकाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 09:51 PM2023-04-08T21:51:39+5:302023-04-08T21:52:01+5:30
Unseasonal Rain In Sindhudurg: हवामान खात्याने कोकणपट्ट्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता त्याप्रमाणे शनिवारी सायंकाळी सह्याद्रीच्या पट्ट्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे.
सावंतवाडी - हवामान खात्याने कोकणपट्ट्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता त्याप्रमाणे शनिवारी सायंकाळी सह्याद्रीच्या पट्ट्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे.सह्याद्री पटयात सांगेली, माडखोल, कलंबिस्त आदी गावांना या पावसाचा तडाखा बसला आहे.
काही गावात तर मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यामुळे रस्त्यावर झाडेही कोसळून वाहतूक कोंडी झाली होती. हवामान खात्याने विदर्भ मराठवाडा व कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज दोन दिवसापूर्वीच वर्तवला होता. त्याप्रमाणे शुक्रवारपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात काहि ठिकाणी दमट हवामान होते तर आंबोली चौकुळ परिसरात पाऊस कोसळला होता शनिवारी ही सकाळपासून हवामान दमट होतेच मात्र सायंकाळच्या सुमारास सावंतवाडी तालुक्यातील काही गावांमध्ये मुसळधार पावसासह वादळी वारे झाले या वादळी वाऱ्यांमुळे काही घरांचे नुकसानही झाले.
त्याशिवाय अनेक झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक कोंडी ही झाली होती. विशेषता सह्याद्रीच्या पट्ट्यात या वादळी वाऱ्याचा तडाखा बसला असून जोरदार पाऊस ही कोसळला आहे. सांगेली गावात तर जोरदार पावसासह रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतूक काहि काळ ठप्प झाली होती सांगेली कडे जाणा-या रस्त्यावर झाड कोसळल्याने तीन तास वाहतूक वाहतूक ठप्प होती ते झाड अखेर ग्रामस्थांच्या मदतीने बाजूला करण्यात आले. तर दुसरीकडे कुडाळ तालुक्यातील काहि गावात ही वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत होता.ही सर्व सांगेली शिरशिंगे या गावांना लागून कुडाळ हद्दीत आहेत. पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत होता.
सावंतवाडीत पावसाचा शिडकाव
सावंतवाडीत सायंकाळ च्या सुमारास पावसाने शिडकाव केला यावेळी जोरदार वादळ झाले.या काळात विजेचा ही लपंडाव सुरू होता.