Sindhudurg: वेंगुर्ला ठरले देशातील पहिले कवितेचे गाव

By स्नेहा मोरे | Published: March 11, 2024 07:31 PM2024-03-11T19:31:56+5:302024-03-11T19:32:18+5:30

Sindhudurg News: कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा ‘कवितेचे गाव’ या प्रकल्पाचा आरंभ करण्यात आला.

Sindhudurg: Vengurla becomes country's first poetry village | Sindhudurg: वेंगुर्ला ठरले देशातील पहिले कवितेचे गाव

Sindhudurg: वेंगुर्ला ठरले देशातील पहिले कवितेचे गाव

मुंबई - कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांचे जन्मगाव असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा ‘कवितेचे गाव’ या प्रकल्पाचा आरंभ करण्यात आला. कविवर्य मंगेश पाडगांवकर ज्या समुद्र किनारी कविता लिहीत त्याच किनाऱ्यावर हे कवितेचे गाव निर्माण करण्यात आले आहे. ' हे ऑन वे' या वेल्स (इंग्लंड) मधील पुस्तकाच्या गावाच्या धर्तीवर ' पुस्तकांचे गाव' ही संकल्पना अस्तित्वात आली. याच धर्तीवर कवितेच्या गावाचीही संकल्पना अस्तित्त्वात आणली आहे.

विविध कविताप्रकारांतील तसेच विविध कवींच्या कवितांची अनेक दालने या ठिकाणी उभारण्याचे प्रस्तावित असून अशी अधिकाधिक दालने होतील याची चाचपणी करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. या कवितेच्या गाव उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षपद कविवर्य मंगेश पाडगांवकरांच्या भाचेसून आणि प्रसिद्ध कवयित्री अनुपमा उजगरे यांनी भूषविले.

या प्रसंगी, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक शामकांत देवरे, संस्थेच्या नियामक मंडळाच्या आणि या प्रकल्पाच्या पुस्तक-निवड-समितीच्या सदस्य रेखा दिघे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मराठीतील श्रेष्ठ आणि प्रसिद्ध कवींची आणि त्यांच्या साहित्याची नवीन पिढीला ओळख व्हावी या बरोबरच या प्रकल्पातून साहित्य-पर्यटन या प्रकाराला चालना मिळावी असे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.शामकांत देवरे यांनी दिली.

Web Title: Sindhudurg: Vengurla becomes country's first poetry village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.